मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत  File Photo
गोवा

Online Fraud | ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पुढारी वृत्तसेवा

डिचोली : राज्यातील महिला, युवतींनी आज सतर्क राहावे, जेणेकरून आपली ऑनलाईन फसवणूक होणार नाही. वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान राहावे. तसेच सरकारतर्फे कायद्या विषयावर लवकरच मार्गदर्शन करणारे कार्यक्रम आयोजित करणार आहे.

साखळी-वेळगे येथील श्री सातेरी कला संघ गोवा आयोजित नवरात्रौत्सवानिमित्त दांडिया नृत्य कार्यक्रमांचे आयोजन सार्वजनिक गणेशोत्सव सभागृहात करण्यात आले होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उ‌द्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.गोपाळ सुर्लकर, सरपंच सपना पार्सेकर, सुर्ल सरपंच साहिमा गावडे, पत्रकार सुरेश बायेकर, सामंता कामत, लवू आमडकर, सगुण घाडी, दुर्गादास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी श्री सातेरी कला संघ वेळगे यांनी दांडिया नृत्य सादर केले सूत्रसंचालन गंधिता वेलिंगकर यांनी केले. साहील प्रियोळकर यांनी आभार मानले.

सातेरी कला संघाचे कार्य उल्लेखनीय 

नवरात्रौत्सव हा महिला शक्तीचा उत्सव आहे. यामुळे महिला वर्गात शैक्षणिक नवचेतना निर्माण होते. वेळगे पंचायत क्षेत्रातील श्री सातेरी कला संघ यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांचा दांडिया नृत्य ग्रुप गोव्यातील विविध भागांत जाऊन आपली सांस्कृतिक कला सादर करून बक्षीस प्राप्त करतात. गोव्याची संस्कृती जपण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT