कर्नाटकातून गोव्यात येणारे 6.75 लाखांचे गोमांस जप्त; दोघांना अटक File Photo
गोवा

कर्नाटकातून गोव्यात येणारे 6.75 लाखांचे गोमांस जप्त; दोघांना अटक

रामनगर पोलिस स्थानाकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

रामनगर : कर्नाटकातून गोव्यात बेकायदा वाहतूक होणारे 6 लाख 75 हजार 500 रुपये किंमतीचे 1930 किलो गोमांस रामनगर पोलिसांनी जप्त केले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

रामनगर पोलिस स्थानाकाचे पोलिस उपनिरीक्षक महंतेश नायक यांच्या नेतृवाखाली सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. त्यात वाहन चालक सिद्दप्पा बाळप्पा बुद्दूर आणि क्लीनर राजू बाळू नाईक ( रा. बेळगाव ) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अमोल मोहनदास ( रा. बेळगाव) याचा पोलिस शोध घेत आहेत.

अनमोड घाटात रस्ता खचल्याने या मार्गांवरील अवजड वाहतूक बंद आहे. त्यामुळे रामनगर पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक महंतेश नायक यांच्या नेतृत्वाखाली पोलिस कर्मचारी रामनगर येथे गस्त घालत होते. यावेळी रामनगर शिवाजी सर्कलमध्ये ए एस आय राजप्पा दोड्डमणी गोव्याच्या दिशेने येणार्‍या वाहनांना अडवून दिशा दाखवत होता. त्यावेळी मिनी टेम्पोने ( के 25-बी-6640) गोव्याच्या दिशेने जात होते. त्या वाहन चालकाला थांबाण्यास सांगितले असता वाहन चालकाने वाहन न थांबवता तेथून वाहन घेऊन गोव्याच्या दिशेने पळ काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र पुढे पोलिसांनी रामनगरजामीया मशिदी जवळ वाहन अडवून चालक व क्लीनर यांची चौकशी केली असता वाहनात गोमांस असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी 1930 किलो गोमांस, वाहन जप्त केले असून दोघांना अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध कर्नाटक कत्तल प्रतिबंधक आणि गोवंश संरक्षण कायदा 2020 च्या कलम 4,5,7,12 आणि 325 • तसेच 192 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT