Bank Holiday Canva
गोवा

Bank Holiday news | पाच दिवसांचा आठवडा करा : संतोष हळदणकर

... अन्यथा आंदोलन सुरूच ठेवणार

पुढारी वृत्तसेवा

पणजी : सर्व बँकांसाठी ५ दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यासाठी आम्ही मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत. मात्र अद्याप यामध्ये कोणतीच हालचाल न झाल्याने आम्ही २७ जानेवारीला अखिल भारतीय बँक संप पुकारला असून, जोवर आमची मागणी मान्य होत नाही तोवर संप करत राहु, असे आवाहन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे संयोजक संतोष हळदणकर यांनी केले.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रोहित भाटीकर, दीपंकर भट्टाचार्जी, नितीन ठाकूर, मॅक्सी परेरा, सुभाष नाईक जॉर्ज तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. हळदणकर म्हणाले की, सध्या दुसरा आणि चौथा शनिवार बँकांसाठी आधीच सुट्टी आहे. मात्र उरलेल्या २ शनिवारी सुट्टी जाहीर करण्यासाठी इंडियन बँक्स असोसिएशनने आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स यांच्यात ७ डिसेंबर २०२३ रोजी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली होती. मात्र त्यानंतर अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मुळातच बँकांमधील काम हे आर्थिक उलढालीचे असल्याने त्याचा प्रचंड ताण असत्तो त्यामुळे आम्हाला परिवारासोबत पुरेसा वेळ मिळत नाही.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आम्ही आठबड्या पाच दिवसांचा कामाचा आठवडा करण्याची मागणी करत असताना सोमवार ते शुक्रवारपर्यंतचे दैनंदिन कामाची वेळ वाढवून ४० मिनिटे जादाचे काम करण्याची तयारी दाखवली आहे. याची शिफारस सरकारकडे योग्यरित्या करण्यात आली आहे, परंतु दुर्दैवाने गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडून मंजुरी प्रलंबित आहे. त्यामुळे शेवटी आम्ही संप करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय, एलआयसी आणि जीआयसीमध्ये हे आधीच लागू करण्यात आले आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये, त्यांची सर्व कार्यालये सोमवार ते शुक्रवारपर्यंतच काम करतात. स्टॉक एक्सचेंज सोमवार ते शुक्रवारपर्यंत कार्यरत असतात. शनिवार आणि रविवार या दिवशी मुद्रा बाजार, परकीय चलन व्यवहार इत्यादी बंद असतात, ते पुढे म्हणाले की, बँकांमध्ये आधीच दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टीचा असतो. त्यामुळे, सोमवार ते शुक्रवार कामाचे तास वाढवून उर्वरित शनिवार सुट्टीचे घोषित केल्यास कुणाचेही नुकसान होणार नाही. याशिवाय दुसरी गोष्ट म्हणजे सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील आर्थिक व्यवहार वाढल्याने कोणत्याही बैंक ग्राहकाला अडचण निर्माण होणार नाही.

संपामुळे ग्राहकांची कोंडी होणार नाही

२७ जानेवारीला बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असला तरी ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांनी आधीच आपली बँकिंग कामे करून घ्यावीत. याशिवाय सर्व एटीएममध्ये पैसे भरण्यात येतील, जेणेकरून पैसे काढताना गैरसोय होणार नाही, अशी माहिती हळदणकर यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT