Dharbandora Car Accident  
गोवा

Dharbandora Car Accident | मुलीला 'सरप्राईज' देण्याआधी दाम्पत्यावर काळाचा घाला

Dharbandora Car Accident | धारबांदोडा येथे अपघात : बंगळुरातील उपव्यवस्थापकेसह पतीचा अंत

पुढारी वृत्तसेवा

फोंडा : पुढारी वृत्तसेवा
दुर्गीणी-धारबांदोडा येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेले दाम्पत्य मुंबईत शिक्षण घेणाऱ्या मुलीला 'सरप्राईज' देण्यासाठी बंगळुरूहून वास्को येथे येत होते, अशी माहिती समोर आली आहे. मृत सिंधू मूर्ती (४८) या बंगळुरातील एका कार कंपनीत उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत होत्या, तर त्यांचे पती सुमन पॉल (५३) हे सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाम्पत्याची मुलगी मुंबईतील एका शिक्षण संस्थेत शिकत आहे. या संस्थेचा कार्यक्रम शनिवारी वास्को येथे होणार होता. त्यात मुलगी सहभागी होणार असल्याने तिला आश्चर्याचा सुखद धक्का देण्यासाठी सुमन पॉल आणि सिंधू मूर्ती बंगळुरूहून वास्कोच्या दिशेने निघाले होते.

मात्र, गोव्याची सीमा ओलांडल्यानंतर काही किलोमीटर अंतरावरच त्यांच्या कारला अपघात झाला. सिंधू मूर्ती यांना कंपनीकडून कार देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी दुर्गीणी-धारबांदोडा येथे कार आणि मालवाहू ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत सुमन पॉल आणि सिंधू मूर्ती यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात सीमा रमेश शिक्के (५३, वास्को, मूळ बंगळूर) या महिला जखमी झाल्या असून, त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. मृतदेहांची उत्तरीय तपासणी शनिवारी सकाळी मडगाव येथील इस्पितळात करण्यात आली.

त्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. निरीक्षक मेलविटो फर्नांडिस यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. सुमन पॉल यांनी बंगळुरातील एका नामांकित कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी सुरू केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT