IFFI 2026 Ashutosh Gowariker  
गोवा

IFFI 2026 Ashutosh Gowariker | 'इफ्फी' महोत्सव संचालकपदी आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती

IFFI 2026 Ashutosh Gowariker | ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) महोत्सव संचालकपदी प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली (संदींदर मोहन):

शेखर कपूर यांनी ५५ व्या आणि ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) महोत्सव संचालक म्हणून काम पाहिल्यानंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आशुतोष गोवारीकर यांची ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या महोत्सव संचालकपदी नियुक्ती केली आहे.

हा महोत्सव २० नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत गोवा येथे आयोजित करण्यात येणार आहे. आशुतोष गोवारीकर हे एक प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, पटकथा लेखक आणि चित्रपट निर्माते आहेत. ५५ व्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय ज्युरीचे अध्यक्षपद भूषवले होते.

माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची, आनंदाची बाब

महोत्सवाच्या संचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर आपली भावना व्यक्त करताना आशुतोष गोवारीकर म्हणाले, या महोत्सवाचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. या महोत्सवाचा प्रवास आणि त्यातील बदल मी जवळून अनुभवले आहेत. १९८४ मध्ये या महोत्सवाला उपस्थित राहण्यापासून ते गेल्या अनेक वर्षापासून त्याच्याशी जोडлеलेले राहण्यापर्यंतचा माझा प्रवास विशेष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT