Asgaon house vandalism case: Court grants pre-arrest bail to prime suspect Pooja Sharma
आसगाव घर तोडफोड प्रकरण : मुख्य संशयित पूजा शर्माला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर  Pudhari Photo
गोवा

आसगाव घर तोडफोड प्रकरण : मुख्य संशयित पूजा शर्माला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आसगाव येथील अगरवाडेकर कुटुंबीयांच्या घराची तोडफोड केल्याप्रकरणी मुख्य संशयित पूजा शर्मा हिला मुंबई उच्च न्यायालयाने सशर्थ जामीन मंजूर केला आहे. हा जामीन मंजूर करताना 22 जुलै रोजी एसआयटी समोर चौकशीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

आसगाव येथील आगरवाडेकर पिता-पुत्रांचे अपहरण करून बाउन्सरच्या मदतीने त्यांचे राहते घर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले होते. या प्रकरणी बाउन्सर व एजंट यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गोव्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक जसपाल सिंगही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. म्हापसा जिल्हा व सत्र न्यायालयाने पूजा शर्मा हीचे अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने पूजा शर्मा हिला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

SCROLL FOR NEXT