हणजूण : पुढारी वृत्तसेवा
कॉस्ता वाडो, शिओली येथील एका खासगी जागेतील आंब्याच्या झाडाजवळ सुशांत मनोहर पालयेकर (५३, रा. दांडो, शिओली) या इसमाचा मृतदेह सापडला. त्याच्या मुलाने तो मृतदेह ओळखला. सुशांत पालयेकर हे त्या खासगी जागेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते.
रविवारी सकाळी १० च्या सुमारास सदर मृतदेह सापडल्यानंतर हणजूण पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक अमीर तरल, सहायक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गवंडी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच हणजूण नैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केला.
सुशांत पालेकर यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करिता गोमेकॉत पाठवून दिला आहे. हणजूण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक साईश शेटगावकर पुढील तपास करीत आहेत.