गोवा

IFFI 2023 Goa : अँड्रो ड्रीम्स’ने भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ

अविनाश सुतार


पणजी: 'अँड्रो ड्रीम्स' हा चित्रपट मणिपूरच्या लोकांच्या कोणी कधी न ऐकून घेतलेल्या आणि इतर माध्यमांमध्ये प्रतिनिधित्व न मिळू शकलेल्या कथा सांगतो. लैबी फान्जोबाम ही साठ वर्षांची महिला मणिपूर या ईशान्येकडील राज्यातील अँड्रो या दुर्गम खेडेगावात हातमाग आणि विणकामाचे दुकान चालवते. वरवर पाहता ही एक अत्यंत सामान्य कथा वाटते. मात्र लैबी फान्जोबाम ही साधीसुधी स्त्री नाही. ती तिच्या प्राचीन गावातील कठोर पितृसत्ताक सामाजिक व्यवस्था, आर्थिक अडचणी आणि रुढीवाद यांच्याशी लढा देत केवळ मुलींसाठीचा फुटबॉल क्लब चालवते. (IFFI 2023 Goa)

तिच्या या अनोख्या आणि आदर्शवत कहाणीबाबत एका छोट्याशा वृत्तपत्रात छापून आलेल्या लेखावर राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक मीना लाँगजॅम यांची नजर पडली. आणि त्यांनी ही कहाणी 'अँड्रो ड्रीम्स' या नावाने चंदेरी पडद्यावर सादर केली. हा माहितीपट म्हणजे लैबी ही उत्साही मनाची वृद्धा आणि तिचा तीन दशकांपासून सुरु असलेला 'अँड्रो महिला मंडळ फुटबॉल क्लब संघटना (एएमएमए-एफसी) हा केवळ मुलींसाठी असलेला फुटबॉल क्लब यांची गोष्ट सांगतो. हा चित्रपट या सर्वांसमोर उभी ठाकणारी आव्हाने आणि त्यांच्या क्लबमधील लक्षवेधी खेळ खेळणारी तरुण फुटबॉल खेळाडू निर्मला हिच्या संघर्षाचे दर्शन घडवतो. (IFFI 2023 Goa)

'अँड्रो ड्रीम्स' या ६३ मिनिटांच्या चित्रपटीय इतिवृत्ताने ५४ व्या इफ्फीमधील भारतीय पॅनोरमाच्या नॉन-फीचर चित्रपट विभागाचा शुभारंभ केला. या प्रायोगिक माहितीपटाच्या निर्मितीची धुरा महिला दिग्दर्शक, महिला निर्माती आणि महिला कलाकार यांच्या त्रिमूर्तीने सांभाळली आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT