म्हापसा : कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये युवकाचा मृत्यू झाला तर युवती जखमी झाली आहे. दरम्यान युवतीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महेश सुंतनुरे (वय.45, रा. बिदर कर्नाटक) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर सोनाली (वय.25, रा. बिदर कर्नाटक ) असे जखमी युवतीचे नाव आहे.
महेश आणि सोनाली यांनी रविवारी (दि.20) जीवनयात्रा संपण्याचा प्रयत्न केला. ही बाब सकाळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आली. यानंतर त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत युवतीला रुग्णालयात दाखल केले, मात्र महेश याचा मृत्यू झाला होता त्यामुळे मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी गोमेकोत पाठवून दिला आहे. यांनी जीवन संपवल्याचे का प्रयत्न केला याचे कारम अद्याप समजू शकले नाही. या घटनेचा अधिक तपास कळंगुट पोलीस करीत आहेत.