Amit Patkar Goa 
गोवा

Amit Palekar Congress | 'गोवा काँग्रेस' पक्षाच्या स्थापनेमागे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचाच हात; अ‍ॅड. अमित पालेकर यांचा गंभीर आरोप

Amit Palekar Congress | गोवा काँग्रेसच्या स्थापनेमागे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचाच हात असून, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा आरोप काँग्रेस नेते अ‍ॅड. अमित पालेकर यांनी केला.

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोवा काँग्रेसच्या स्थापनेमागे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचाच हात असून, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असा आरोप काँग्रेस नेते अ‍ॅड. अमित पालेकर यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपने नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी १०० कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट केला होता.

त्यानंतर लगेचच गोवा काँग्रेसची घोषणा झाली. पक्षाच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली १०० प्रतिज्ञापत्रे मूळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मिळवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे तो प्रयत्न फारसा यशस्वी झाला नसल्याचा दावा पालेकर यांनी केला.

थिवीचे जिल्हा पंचायत सदस्य निलेश कांबळी यांनी पाटकर यांनी गोवा काँग्रेससाठी दोन व्यक्ती देण्यास सांगितल्याचे म्हटले होते. याबाबत आपण, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष सुनील कवठणकर साक्षीदार असल्याचे पालेकर यांनी यावेळी सांगितले.

गोवा काँग्रेस या नावाला विरोध करण्यासाठी काँग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतरच्या बैठका, न्यायालयीन कामकाज आणि पक्षबांधणीच्या सुरुवातीच्या प्रक्रियेमागेही पाटकर असल्याचे समजल्याचा दावा त्यांनी केला.
गोवा काँग्रेसच्या माध्यमातून एक स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता, राजकीय विश्लेषक आणि निवडणुकीत पराभूत झालेला उमेदवार काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचा आरोपही पालेकर यांनी यावेळी बोलताना केला.

पालेकर म्हणाले की, भाजपमधील काही आमदार गोवा काँग्रेसमध्ये येणार असल्याचे सांगून हा कार्यकर्ता कुंभारजुवे, सांताक्रूझ, ताळगाव, पणजी, बार्देश आणि दक्षिण गोव्यातील काँग्रेसच्या मतदारसंघात सक्रिय असल्याचे पालेकर म्हणाले. संबंधित व्यक्ती भाजपचीच असल्याचा आरोप करून, तिच्या भेटीगाठी आणि निधीच्या स्रोतांची माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षासोबत कायम आहेत. गोवा राखण यात्रेला राज्यभरातून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे भाजपकडून काँग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांची नाहक बदनामी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT