Ajay Kholkar  
गोवा

Ajay Kholkar | निवडणुकीच्या तोंडावर राजकीय जुगलबंदीला उधाण; खोलकर यांच्या यू-टर्नमुळे खळबळ

Ajay Kholkar | बोरकर यांच्यावर पैसे स्वीकारल्याचा आरोप केल्याचे केले स्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

अजय खोलकर यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या पूर्वीच्या विधानाबाबत आता वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी त्यांनी आमदार वीरशेड बोरकर यांनी दुसऱ्या एका राजकीय पक्षाकडून ३ कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप सार्वजनिकित्या केला होता. मात्र, आमदार वीरशेड बोरकर यांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या कायदेशीर नोटीशीला ११ नोव्हेंबर रोजी दिलेल्या लेखी उत्तरात खोलकर यांनी असा कोणताही आरोप केल्याचे स्पष्टपणे नाकारले आहे.

वीरशेड बोरकर यांनी कोणत्याही राजकीय पक्षाकडून ३ कोटी रुपये स्वीकारल्याचा आरोप आपण कधीही केलेला नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. या संदर्भात रिव्होल्यूशनरी गोवन्स पार्टीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात, खोलकर यांनी असा कोणताही आरोप केला नसेल, तर त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर नेमके काय सांगितले होते, असा सवाल उपस्थित केला आहे.

केवळ प्रसिद्धीसाठी सनसनाटी विधाने केली होती का, तसेच अशा विधानांचे परिणाम लक्षात न घेता बेजबाबदारपणे आरोप केले होते का, असे प्रश्नही पक्षाने उपस्थित केले आहेत.

कायदेशीर उत्तरात आधिच्या विधानांना नकार दिला जात असेल, तर माध्यमांसमोरच्या त्यांच्या दाव्यावर जनतेने कितपत विश्वास ठेवावा, असेही पत्रकात म्हटले आहे.

वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांसमोर सनसनाटी आरोप करायचे, त्यातून सार्वजनिक वाद निर्माण करायचा आणि कायदेशीर प्रक्रियेत जाब विचारला असता त्याच आरोपांपासून माघार घ्यायची, हे योग्य नाही, अशी भूमिका पक्षाने मांडली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT