मिकी पाशेको Pudhari File Photo
गोवा

व्हेन्जींनी बेतालभाटीत ढवळाढवळ करू नये

माजी मंत्री पाशेकोंचा सल्ला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच सासष्टीत राजकीय धुमशान

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : विधानसभा निवडणुकीला अजून दोन वर्षांचा कालावधी आहे. मात्र आतापासून सासष्टी तालुक्यात राजकीय वाद रंगात येऊ लागला आहे. बाणावलीचे आपचे आमदार व्हेन्जी व्हिएगस यांच्या बेतालभाटीतील हस्तक्षेपामुळे माजी मंत्री मिकी पाशेको नाराज झाले आहेत. त्यांनी व्हेन्जी यांना बेतालभाटीत ढवळाढवळ न करता स्वतःच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.

मी दहा वर्षे बाणावलीचा आमदार होतो. पण कधीच पिस्तूलधारी गुंडांना घेऊन फिरण्याची माझ्यावर वेळ आली नाही. नुवे मतदारसंघात कार्यालय उघडण्याचे स्वप्न पहाणार्‍या व्हेन्जींनी कोलवाच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवावेत, असे आवाहन मिकी पाशेको यांनी केले आहे.

मडगावात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत मिकी पाशेको बोलत होते. पाणी अडून राहिलेल्या वृत्ताचा बाऊ करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकर्‍यांनी पंचायतीला सांगितले असते तर कोणत्याही गोंधळाविना पाण्याला वाट करून देत तो विषय सोडवला जाऊ शकला असता. या ठिकाणी एक बेकायदा रिसॉर्ट असून त्यामध्ये काम करणारे व्यवस्थापक हे कुङतरीतील आपचे उमेदवार आहेत. तर त्या बेकायदा रिसॉर्टला काम पूर्ण होण्यापूर्वीच पंचायतीने दाखला दिला आहे. स्वतःला शेतकरी बनवणार्‍या त्या पंचायत सदस्याजवळ स्वतःची शेतीच नसल्याची टीका मिकी पाशेको यांनी केली.

‘गुंडगिरीला कधीच पाठिंबा दिला नाही’

आठ कामगारांना घेऊन ते पाणी समुद्रात सोडता आले असते त्यासाठी एवढा मोठा बाऊ करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. शेतकर्‍यांनी त्यांच्या पंच सदस्याला सांगितले असते तरीही ते काम झाले असते. मी दहा वर्षे बाणावलीचा आमदार होतो. पण कधीच गुंडगिरीला पाठिंबा दिला नाही. व्हेन्जी व्हिएगस आमदार बनल्यापासून त्यांनी बाणावलीत पिस्तूल घेऊन फिरणारे गुंड लागतात, असा खळबळजनक आरोप पाशेको यांनी केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT