पेडणेत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; २ युवती जागीच ठार, १ गंभीर जखमी File Photo
गोवा

पेडणेत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; २ युवती जागीच ठार, १ गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्तसेवा

उत्तर गोव्यातील पेडणे तालुक्यात असणाऱ्या मांद्रे येथे झालेल्या भीषण अपघातात दोन युवती जागीच ठार झाल्या. या अपघातात एक युवती गंभीर जखमी झाली आहे. जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक, रिक्षा आणि दुचाकी मध्ये हा अपघात झाल्‍याची माहिती समोर येत आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भरधाव ट्रकने रिक्षा आणि दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवर असणाऱ्या सानिका सुभाष खर्बे ( १९) व प्रियंका संदेश खर्बे (वय२९) व सिद्धी हनुमंत शेटकर या रस्त्यावर फेकल्‍या गेल्या. यात सानिका आणि प्रियंका या जागीच ठार झाल्या, तर सिद्धी गंभीर जखमी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे मांद्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आजचे सर्व कार्यक्रम , स्पर्धा रद्द केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT