'उद्योग आणि रोजगार संधीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प'  Pudhari Photo
गोवा

Parliament Budget Session 2024 : 'उद्योग आणि रोजगार संधीला प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प'

गोवा चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत तज्ञांनी व्यक्त केले मत

पुढारी वृत्तसेवा

पणजी : पुढारी वृत्‍तसेवा

उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देताना रोजगार संधी निर्माण करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चासत्रात उद्योजक आणि अर्थतज्ज्ञांनी दिली.

कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देताना ग्रामीण विकास, ऊर्जा निर्मिती, साधन सुविधांची निर्मिती, नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन आणि नव्या तंत्रज्ञानाला गती देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. या बैठकीत चेंबर ऑफ कॉमर्सचे राल्फ डिसूजा, मंगिरिश पै रायकर, संजय अमोणकर, प्रतिमा धोंड, मिलिंद शिरोडकर, रोहन भंडारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT