HIV cases reported | दहा महिन्यांत 237 जणांना एचआयव्ही संसर्ग 
गोवा

HIV cases reported | दहा महिन्यांत 237 जणांना एचआयव्ही संसर्ग

70 टक्के पुरुष : बार्देशमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक; एड्समुळे 20 मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

पणजी : जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या दहा महिन्यांच्या काळात राज्यात 237 एचआयव्ही संसर्ग झाल्याची नोंद आहे. यात 70 टक्क्यांहून अधिक पुरुष असून बार्देश तालुक्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे आढळते.

गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटीने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते ऑक्टोबर 2025 दरम्यान राज्यात 237 एचआयव्ही पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहे. आढळलेल्या एकूण प्रकरणांपैकी, लैंगिक मार्ग हा प्रसाराचा प्रमुख मार्ग राहिला असून यात 223 प्रकरणे (97.8 टक्के) आढळली आहेत. त्यानंतर पालकांकडून मुलांमध्ये दोन प्रकरणे (0.9 टक्के) आणि संक्रमित सिरिंज आणि सुयांमधून एक प्रकरण (0.4 टक्के) आढळले आहे. याच काळात राज्यात एड्सचे सात रुग्ण आढळले असून एड्समुळे 20 मृत्यू झाले आहेत.

एचआयव्ही पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार तालुक्यांमध्ये जवळपास 60 टक्के होती. यात बार्देशमध्ये सर्वाधिक 55 रुग्ण (24.1 टक्के) आढळले. त्यानंतर सासष्टीमध्ये 33 रुग्ण (14.4 टक्के), तिसवाडीमध्ये 24 रुग्ण (10.5 टक्के) आणि मुरगावमध्ये 23 रुग्ण (10 टक्के) आढळल्याची माहिती एड्स नियंत्रण संस्थेने दिली आहे. सध्या, 2005 ते ऑक्टोबर 2025 पर्यंत एचआयव्हीग्रस्त 3,577 लोक अँटीरेट्रोव्हायरल उपचार (एआरटी) पद्धतीवर जिवंत आहेत. पीएलएचआयव्हीएसच्या राहणीमानात सुधारणा करण्यासाठी, गोवा एड्स नियंत्रण संस्थेतर्फे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. यात एआरटीची मोफत उपलब्धता, नियमित वैद्यकीय तपासणी, काळजी आणि समर्थन केंद्रांद्वारे पोषण सहाय्य यांचा समावेश आहे.

समुपदेशनावर भर : डॉ. वंदना धुमे

एचआयव्हीचे लवकर निदान होण्यासाठी वैद्यकीय तपासणी केल्या जातात. संसर्गांवर उपचार, सह-संबंधांचे व्यवस्थापन यासह विशेष आरोग्य सेवांसाठी माहिती पुरवली जाते. समुपदेशन आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील पथक एआयटीसीचे पालन करत योग्य ते मार्गदर्शन, घरी जाऊन मार्गदर्शन, समुदाय-स्तरीय समर्थन उपक्रम राबवतात, अशी माहिती राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या संचालिक डॉ. वंदना धुमे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT