कोकण रेल्वेच्या १४ गाड्या रद्द; प्रवाशांचे हाल : ७ गाड्यांचा मार्ग बदलला File Photo
गोवा

कोकण रेल्वेच्या १४ गाड्या रद्द; प्रवाशांचे हाल : ७ गाड्यांचा मार्ग बदलला

पुढारी वृत्तसेवा

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

कोकण रेल्वे मार्गावर दिवाणखावटी येथे दरड कोसळल्यामुळे आत्तापर्यंत 14 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 7 गाड्या दुसर्‍या मार्गाने वळवण्यात आल्या असून 4 गाड्या अंशतः रद्द केल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

गाडी क्रमांक 10103 मुंबई सीएसएमटी मडगाव जं. मांडवी एक्सप्रेस, गाडी क्र. 50108 मडगाव जं. सावंतवाडी रोड प्रवासी गाडी, रेल्वे क्रमांक 10106 सावंतवाडी रोड - दिवा एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22229 मुंबई सीएसएमटी मडगाव जं. वंदे भारत एक्सप्रेसचा 15 रोजीचा प्रवास रद्द करण्यात आला आहे.

गाडी क्रमांक 10104 मडगाव जं. मुंबई मांडवी एक्सप्रेस, गाडी क्र. 11004 सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12134 मंगळुरु जं.- मुंबई एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12133 मुंबई सीएसएमटी - मंगळुरू जं., गाडी क्रमांक 20111 मुंबई सीएसएमटी - मडगाव जं. कोकण कन्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

गाडी क्रमांक 11003 मुंबई सीएसएमटी मडगाव जं. तुतारी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 50104 रत्नागिरी दिवा प्रवासी गाडी, गाडी क्रमांक 12051 मुंबई सीएसएमटी - मडगाव जं. जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 10105 दिवा-सावंतवाडी रोड एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

वळवण्यात आलेल्या गाड्या :

गाडी क्र. 22150 पुणे जं. एर्नाकुलम जं. एक्सप्रेसला कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळविण्यात आली असून गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेसही वळविण्यात आली आहे. गाडी क्र. 09057 उधना मंगळुरु जंक्शन गाडी कल्याण लोणावळा दौंड जंक्शन मार्गे वळवण्यात आली आहे. गाडी क्र. 12432 ह निजामुद्दीन तिरुवनंतपुरम मध्य राजधानी एक्सप्रेसचा प्रवास पनवेल - लोणावळा - दौंड जंक्शन मार्गे वळवली आहे. गाडी क्र. 12618 एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं.चा प्रवास भुसावळ जंक्शन मार्गे वळवण्यात आला आहे. गाडी क्र. 16335 गांधीधाम नागरकोइल एक्स्प्रेसचा प्रवास कल्याण लोणावळा पुणे जंक्शन मार्गे वाडी गुंटकल धर्मावरम जं. जोलारपेट्टाई- इरोड जं. इरुगुर जं. पोदनूर जं. पलक्कड जं. शोरानूर आणि पुढील योग्य मार्गावर वळवण्यात आला. गाडी क्र. 12284 एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं. एक्सप्रेस कल्याण - लोणावळा - दौंड जंक्शन मार्गे पुन्हा वळवण्यात आली आहे.

अंशतः रद्द केलेल्या गाड्या :

गाडी क्रमांक 12052 मडगाव जं. मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक 22120 मडगाव जं. तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक 20112 मडगाव जं. मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस, गाडी क्र. 11004 सावंतवाडी रोड दादर तुतारी एक्सप्रेस रत्नागिरीत थांबविण्यात आल्या आहेत.

प्रवाशांना जेवण, पाण्याची सुविधा

कोकण रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांसाठी बससेवा पुरवण्यात येत आहे. कोकण रेल्वेच्या विविध स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. मुंबईच्या दिशेने जाणार्‍या प्रवाशांसाठी खेड, चिपळूण आणि रत्नागिरी येथे एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे, असे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आलेले आहे. मात्र, काही ठिकाणी जेवण व पाणीही मिळत नसल्याच्या तक्रारी काही प्रवाशांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT