पणजी : पुढारी वृत्तसेवा वागातोर येथे आयोजित सनबर्न संगीत नृत्य महोत्सवात हजारो तरुण तरुणींचा सहभाग होता. संगीत आवाजाची क्षमता भंग केल्यामुळे सनबर्नची एक स्टेज पोलीसांनी बंद केली. पोलीस उप अधिक्षक जिवबा दळवी यांनी ही कारवाई केली. दोन मुलींना ईस्पितळात हलवले असून, नेमके कारण अस्पष्ट आहे. ड्रग्सचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सनबर्न पासची चोरी झाल्याचा प्रकारही समोर आला आहे. सनबर्नच्या ५ कर्मचाऱ्यांनी ८०.५० लाख किमतीचे ६०० पास चोरल्याचे समोर आले आहे. यातील काही पास त्यांनी विकल्याची माहिती समोर येत आहे. व्यस्थापनाने पोलीस तक्रार करताच ५ ही कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असून, ५० लाखाचे पास जप्त करण्यात आले आहेत.
हेही वाचा :