पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात हिंदुत्ववाद्यांचा आक्रोश होत आहे. हिंदूचा आक्रोश काय आहे हे पाहायच असेल तर काश्मिरला जाऊन पाहा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा केंद्रासह राज्य सरकारला केले. (Sanjay Raut)
… हे तर केंद्र सरकारचे अपयश
शिवाजी पार्क (मुंबई) येथून रविवारी (दि.२९) सकल हिंदू समाजाकडून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याच्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यात अनेक हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या. यावर बोलत संजय राऊत म्हणाले," पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्यासारखे हिंदुत्ववादी नेते आहेत. राज्य़ आणि देशात भाजपचे सरकार आहे. केंद्रात ८ वर्षांपासून हिंदुत्ववाद्यांचे सरकार असताना लव जिहाद, धर्मांतर सारख्या घटना घडत असतील तर तर या सत्तेचे अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
हिंदूचा आक्रोश पाहायचा असेल तर काश्मिरला जावून तो पाहावा. काश्मीरमध्ये आजही हजारो हिंदू पंडीत आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आक्रोश करत आहेत. आपल्या घरी ते आजही जावू शकले नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
मी मोर्चेकरांचे अभिनंदन करतो
नरेंद्र मोदी यांच सरकार हिंदुत्ववाद्यांना गोळ्या घालणाऱ्या मुलायमसिंह यांचा पद्मविभूषण सन्मान करत आहे. पण वीर सावरकर, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान केला जात नाही. या सगळ्या मुद्यांवर कदाचित हा हिंदू आक्रोश मोर्चा काढला असावा. हा मोर्चा निघाला तो अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या भूमिकेविरोधात निघाला. म्हणून मी मोर्चेकरांचे अभिनंदन करतो, असेही राऊत म्हणाले.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.