तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यातील आढले (खुर्द) गावामध्ये एका घरातून घोणस सापांच्या 20 पिल्लांना वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे. तसेच, त्यांना निर्सगाच्या अधिवासात सोडून दिले आहे. निसर्गाच्या अधिवासात
दिले सोडून आढले गावात तेजस रामदास भालेसेन यांच्या घराच्या आवारात बाथरुमजवळ त्यांच्या आईस काही सापांची पिल्ले दिसली. त्यांनी तत्काळ वन्यजीवरक्षक मावळ संस्थेशी संपर्क साधला.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे जिगर सोलंकी व झाकीर शेख घटनास्थळी पोहोचले आणि 2 तासांत त्यांनी घोणस जातीची 20 पिल्ले आणि मादी सुखरूप ताब्यात घेतली. तसेच याची माहिती त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव व वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थपक निलेश गराडे यांना दिली. तसेच, घोणस या सापांची पिल्ले व मादी यांना निर्सगाच्या अधिवासात सोडून दिले आहे. रात्रीच बाहेर जाताना टॉर्च व बुटाचा वापर करावा आणि कोणताही साप न मारता जवळच्या प्राणीमित्राला किंवा वनविभागला संपर्क करावा, असे आवाहन निलेश गराडे आणि अध्यक्ष अनिल आंद्रे यांनी केले आहे.
घोणस हा मावळ भागातला एक विषारी साप आहे. हा साप अंडी घालत नाही. जून महिन्यात घोणस सापाची मादी पिल्लांना जन्म देते. मादी 15-70 पिल्ले एका वेळीस जन्माला घालू शकते. घोणस साप चिडल्यावर कुकरची शिट्टीसारखा आवाज काढतो. असे करून तो सतर्क करतो की माझ्याजवळ येऊ नये. पिल्ले जन्मताच विषारी असल्यामुळे त्यांना पकडू नये.
– जिगर सोलंकी, सदस्य, वन्यजीव रक्षक संस्था
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.