Girish Mahajan In Nagpur 
Latest

Girish Mahajan In Nagpur: ‘तुतारी’ वाजणार नाही ‘मशाल’ काही पेटणार नाही – गिरीश महाजन

मोनिका क्षीरसागर
नागपूर; पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाले असले तरी ही 'तुतारी' आता त्यांनी प्राणपणाने फुंकावी. महाराष्ट्रात घेऊन फिरावी, आमच्या सदिच्छा आहेत. आम्ही एवढंच सांगणार की, "'तुतारी' ही वाजणार नाही आणि उद्धवजींची 'मशाल'ही पेटणार नाही" असे टीकास्त्र  ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज (दि.२४) यवतमाळ दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना सोडले. (Girish Mahajan In Nagpur)
महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्याबाबत काही बोलायचं, काही अफवा पसरवायच्या हा त्यांचा उद्योग झालाय. मी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना सांगतोय तुम्ही तुमचं बघा आम्ही कोणत्या जागा लढवायच्या कुठे लढायचं ते आम्ही ठरवू असेही महाजन यांनी ठाकरे गटाला बजावले. जरांगे यांचे आंदोलन, मराठा आरक्षण संदर्भात महाजन म्हणाले, मी सहा वेळा मनोज जरांगेंकडे गेलो दोनवेळा गुलाल घेऊन झाला. (Girish Mahajan In Nagpur)
सरकारकडून ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या सरकारने केल्या आहेत. मागासवर्गीय आयोग कामाला लावला, आतापर्यंत सरकारने आरक्षणावर सर्वांना कामाला लावलं  आहे. त्यामुळे कुठे तरी जरांगे-पाटीलांना समाधान मानायला हवे. सुप्रीम कोर्टात पुन्हा आपली याचिका जिवंत झाली आहे. सरकारची इच्छा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे असेही गिरीश महाजन म्हणाले. (Girish Mahajan In Nagpur)
हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT