Latest

Gholamreza Ardeshiri Alive Only By Drinking : अजब दावा : म्‍हणे, १७ वर्ष अन्‍नाचा कणही न खाता नाही, केवळ कोल्‍ड्रिंक्‍सवर जिवंत…

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : एका व्यक्तीने अजब दावा केला आहे. त्याचे म्हणणे आहे की त्याला भूक लागत नाही. तसेच तो मागील १७ वर्षांपासून फक्त कोल्‍ड्रिंक्‍स पिऊन जिंवत आहे. त्याने २००६ पासून अन्न त्यागले आहे. इतकेच नाही तर त्याने तो केवळ चारच तास झोप घेतो असे म्हटले आहे. या त्याच्या दाव्यांवर लोक वेगवेगळी मते व्यक्त करत असून मूळचा इराणच्या असणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. (Gholamreza Ardeshiri Alive Only By Drinking)

डेली स्टारच्या बातमीनुसार या व्यक्तीचे नाव घोलमरेजा अर्देशिरी असे आहे. अर्देशिरी दावा केला आहे की मागील १७ वर्षांपासून त्याने अन्नाचा एक कणही खाल्लेला नाही. तो त्याचा संपूर्ण दिवस केवळ पेप्सी आणि सेव्हन अप पिऊन घालवतो. कोल्‍ड्रिंक्‍स पिऊन तो केवळ जिंवतच नाही तर अत्यंत स्वस्थ सुद्धा आहे. (Gholamreza Ardeshiri Alive Only By Drinking)

फायबर ग्लासच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या अर्देशिरीचे म्हणणे आहे की, त्याचे पोट फक्त कोल्‍ड्रिंक्‍सच पचवू शकते. जर त्याने दुसरे काही खाण्याचा प्रयत्न केला तर त्याला लगेच उल्टी होते. २००६ साली त्याने शेवटचे जेवण केले होते. त्यानंतर तो फक्त कोल्‍ड्रिंक्‍स पिऊनच जिवंत आहे. अर्देशिरीच्या म्हणण्यानुसार, पेप्सी आणि ७ अप्स सारखे कार्बोनेटेड ड्रिंक पासून मिळाणारी उर्जा त्याला जिंवत ठेवते आणि ती पोट भरण्यासाठी पुरेशी आहे.

याबाबत अर्देशिरींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याचेही सांगितले. पण तिथे त्यांना या साऱ्या त्यांच्या मनाची कल्पना असल्याचे सांगण्यात आले. खरे तर अर्देशिरींनी डॉक्टरांना सांगितले की, जेव्हाही मी जेवतो तेव्हा मला माझ्या तोंडात केस गेल्यासारखे वाटते. तर कोल्ड्रिंक्सबाबत अशी कोणतीही समस्या निर्माण होत नाही.

डॉक्‍टरांनी अर्देशिरींना मानसोपचार तज्ज्ञांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. अजूनपर्यंत, अर्देशिरींना त्यांच्या बदलेल्या भूकेबद्दल नेमके कारण समजू शकलेले नाही. पण, तज्ज्ञांच्या मते लठ्ठपणा आणि साखर वाढवण्यात कोल्ड्रिंक्स महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे, ते फारच कमी प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT