नरेंद्र साठे
पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट मोबाईल अॅपवर नोंदणी झाल्याने नागरिकांना मोबाईलमध्येच दाखले मिळत आहेत. राज्य सरकारच्या ग्रामविकास विभाग आणि पंचायतराज विभागामार्फत महा-ई-ग्राम सिटिझन कनेक्ट नावाने अॅप सुरू केले आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत 1 हजार 384 ग्रामपंचायतींनी या अॅपवर नोंदणी केली आहे.
अॅपमधून कोणते दाखल मिळतात?
जन्म-मृत्यू नोंदीचा दाखला, विवाह नोंदीचा दाखला, दारिर्द्यरेषेखालील दाखला, मिळकतीचा उतारा आदी दाखल्यांसाठी मागणी अॅपमधून करता येईल. आपल्या कराचा भरणा करून रीतसर पावती मिळवू शकता. यामुळे करवसुली जलदगतीने होऊन ग्रामपंचायत उत्पन्नामध्ये भर पडत आहे. याशिवाय ग्रामपंचायतीला सूचनादेखील नोंदविणे शक्य आहे.
आतापर्यंत एवढ्या नागरिकांनी केली नोंदणी…
तालुका ग्रामपंचायती नोंदणी संख्या
आंबेगाव 103 542
बारामती 98 835
भोर 156 891
दौंड 80 2,327
हवेली 71 730
इंदापूर 116 441
जुन्नर 143 594
खेड 162 1,068
मावळ 103 1,149
मुळशी 92 710
पुरंदर 93 1,171
शिरूर 96 669
वेल्ह 71 563
एकूण 1384 11,680
महा ई-ग्राम सिटिझन कनेक्ट अॅपमुळे नागरिकांना ग्रामपंचायतीमधून मिळणार्या प्रमाणपत्रांकरिता कार्यालयात जाण्याची गरज नाही. त्यांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येईल व प्रमाणपत्र घेता येईल. त्यामुळे वेळेची बचत होईल.
सचिन घाडगे,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे