प्रातिनिधिक छायाचित्र. 
Latest

‘रक्‍तरंजित’ संघर्षाला पूर्णविराम नाहीच! गाझा युद्धविराम संपणार! : हमासचा दावा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्त्रायल-हमास युद्धविराम (Israel-Hamas War) आज ( दि. _सकाळी ७ वाजता (स्थानिक वेळेनुसार) संपुष्टात येणार आहे, असे वृत्त 'द टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिले आहे. युद्धविरामाला आणखी मुदत वाढविण्‍यासाठी तीन इस्रायली नागरिकांच्‍या मृतदेहांसह ७ महिला आणि मुलांची सुटका करण्याचा प्रस्ताव इस्त्रायलने ठेवला हाेता. दरम्‍यान,गाझा पट्टीतील लढाईतील तात्पुरती विराम वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढवत असतानाही इस्रायल-हमास युद्ध पुन्हा सुरू होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

हमासने ओलीस ठेवलेल्‍या नागरिकांच्‍या सुटकेसाठी हमासने सुमारे ५० इस्‍त्रायलच्‍या ओलीस नागरिकांची सुटका करणे आणि इस्रायली तुरुंगातून पॅलेस्टिनी महिला आणि मुलांची सुटका करण्यासाठी २४ नोव्‍हेंबरपासून चार दिवसांसाठी युद्धविरामाची घोषणा करण्‍यात आली होती. यामध्‍ये आणखी दोन दिवसांची म्‍हणजे बुधवार २९ नोव्‍हेंबरपर्यंत वाढ करण्‍यात आली होती.

युद्धविरामाच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी १० इस्रायली नागरिकांसह 16 ओलिसांची सुटका करण्यात आली. दरम्यान, ३० पॅलेस्टिनी नागरिक यामध्‍ये १६ अल्पवयीन आणि १४ महिलांना इस्रायलने मुक्त केले आहे, असे कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते माजेद अल-अन्सारी यांनी जारी केलेल्‍या निवेदनात नमूद करण्‍यात आले आहे.

युद्धविराम सुरू झाल्यापासून आतापर्यंत सुमारे ९७ ओलिसांची हमासने सुटका केली आहे, असे वृत्त 'रॉयटर्स' या वृत्तसंस्‍थेने दिले आहे. तर इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, गाझा पट्टीमध्ये अजूनही १४५ इस्‍त्रायली नागरिक ओलीस आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT