Gautami Patil  
Latest

गौतमी पाटील, सपना चौधरी, सनी लिओनी थिरकणार ‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटात

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सबसे कातिल गौतमी पाटील या नावाची ओळख वेगळी सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील ही स्टेज डान्सर म्हणून प्रसिद्ध आहे. आता ती संजीवकुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित "द महाराष्ट्र फाईल्स" या आगामी मराठी चित्रपटात थिरकताना दिसणार आहे.

या चित्रपटात गौतमी ही एका हिंदी गाण्यावर डान्स बार गर्लच्या लुक मध्ये दिसणार आहे. हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटात मोठी स्टार कास्ट आहे. "द महाराष्ट्र फाईल्स " हा चित्रपट देशात आणि जगभरात ८५० पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. या चित्रपटात मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी, नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशील राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवि धनवे, प्रमोद गायकवाड यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाला संगीत नितीन-अजित, सिदार्थ कश्यप, संजय लोंढे यांनी दिले आहे.

कला दिग्दर्शन उल्हास नान्द्रे व जगन्नाथ हातनकर व अफसर खान यांनी केले आहे गायन अजय अतुल फेम अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, साक्षी होळकर, अमरिश आणि शांताबाई फेम संजय लोंढे, यांनी केले आहे. या चित्रपटाची सहनिर्माती शालीनी राठोड व रोहीत चौधरी यांनी केली आहे.

हा चित्रपट सामाजिकरित्या वंचित व दुर्बल घटकावर व त्यांच्या समस्यावर आधारीत आहे. हा चित्रपट कुठल्याही राजकीय पक्षाचा अंजेडा नाही आहे. सर्वसामान्य शेतकरी, विधवा महिला, विद्यार्थी यांची फाईल असून सर्व राजकीय पक्षांनी सर्व सरकारी व प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकत्यांनी आवर्जुन पाहावे, अशी विनंती केली आहे.

हा चित्रपट १३ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये शांताबाई या फेमस गाण्यावर सनी लिओनी थिरकणार आहे. हरियाणाची डान्सर सपना चौधरी पहिल्यांदा मराठमोळ्या रूपात दिसणार आहे. व गौतमी पाटील डान्सबार गर्लच्या रूपात मराठी चित्रपटामध्ये हिंदी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

अधिक वाचा –

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT