उद्या 'या' वेळेतच करा बाप्पाची प्रतिष्ठापना file photo
गणेशोत्सव पूजा, धार्मिक विधी आणि प्रसाद

Ganesh Chaturthi 2024 | उद्या 'या' वेळेतच करा बाप्पाची प्रतिष्ठापना

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : गणपती बाप्पाचे आगमन (Ganesh Chaturthi 2024) अवघ्या एक दिवसांवर आले असून, उद्या शनिवारी भाद्रपद शु. चतुर्थीच्या दिवशी ब्राह्ममुहर्तापासून म्हणजे पहाटे ४:५० ते दुपारी १:५१ पर्यंत आपल्या सोवीने घरातील पार्थिव गणेशाची स्थापना आणि पूजन (Ganpati Sthapana Muhurat 2024) करता येणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना मध्याह्नानंतर देखील करता येऊ शकते, अशी माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी दिली. (Ganeshotsav 2024)

१० सप्टेंबर रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर रात्री ८ वाजून ०४ मिनिटांपर्यंत कधीही गौरी आवाहन (Ganesh Chaturthi 2024) करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे, असे असल्याने दिनांक ११ सप्टेंबर रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक १२ सप्टेंबर रोजी गुरुवारी रात्री ९:५३ पर्यंत गौरी विसर्जन करता येईल.

१७ सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. हा गणेश स्थापनेपासून ११ वा दिवस असल्याने ज्यांच्याकडे अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन केले जाते त्यांच्याकडे ११ दिवसांचा उत्सव असेल, तसेच या दिवशी मंगळवार म्हणजे गणेशाचा वार असला तरीही परंपरेप्रमाणे विसर्जन करावे. या दिवशी चतुर्दशी तिथी दुपारी पावणे बारा वाजताच संपत असली तरीही त्या नंतर देखील विसर्जन करता येईल. विसर्जनाच्या वेळेस गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत असतो त्याप्रमाणे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा खरंच लवकर म्हणजे २७ ऑगस्ट २०२५ रोजी येणार आहेत, अशी माहितीही दाते यांनी दिली. (Ganesh Chaturthi 2024)

SCROLL FOR NEXT