डीजे, बँड जीपसह ट्रॅक्टर-ट्रॉली पोलिसांकडून जप्त करण्यात आले Pudhari photo
गणेशोत्सव

Karad Ganesh Visarjan clash | कराडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट, मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन वाद

karad today news: डीजे, बँड जीपसह ट्रॅक्टर-ट्रॉली पोलिसांकडून जप्त, फटाक्यांच्या माळेमुळे वादाला मिळाले उग्र वळण, १६ जणांविरुद्ध कराड तालुका पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

धोंडेवाडी (ता. कराड) येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरून वाद झाला. दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. दि. २४ सप्टेंबर रोजी रात्री मंदिर चौकात ही घटना घडली.

नवरभारत व धनराज गणेश मंडळांच्या मिरवणुका मंदिर चौकात आल्यानंतर मोठ्या आवाजावरून वाद सुरू झाला. त्यात एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीजवळ फटाक्यांची माळ लावल्याने वाद अधिक चिघळला. पोलिसांनी डीजे व बँड बंद करण्याच्या सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी १६ जणांविरुद्ध कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ (ब) व १९४ (२) अन्वये कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याच्या अनुषंगाने दोन्ही मंडळांचा डीजे, बँड जीप व ट्रॅक्टर-ट्रॉली असा सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. विसर्जन मिरवणुकीत हुल्लडबाजी न करता मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य टाळावे आणि न्यायालयाच्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT