Latest

Nobel Prize in Literature : साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका ॲनी एर्नॉक्स यांना जाहीर!

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वीडिश अॅकडमी ऑफ सायन्सने आज (दि. 6) साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कारची घोषणा केली. फ्रेंच लेखिका ॲनी एर्नॉक्स यांना पुरस्कार देण्यात आला आहे. अॅनी यांच्या लिखाणाचा मुक्ती शक्तीवर विश्वास आहे. त्यांचे कार्य तुलनेच्या पलीकडे आहे आणि साध्या भाषेत लिहिलेले स्वच्छ साहित्य आहे, असे स्टॉकहोम येथील कार्यक्रमात स्वीडिश अकादमीने स्पष्ट केले.

अॅनी एर्नॉक्स कोण आहेत?

फ्रेंच लेखिका अॅनी एर्नॉक्स यांचा जन्म 1940 मध्ये झाला. नॉर्मंडी मधील यव्हेट या छोट्याशा गावात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे पालक उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान आणि कॅफे चालवायचे. एर्नॉक्स लहानपणापासूनच महत्त्वाकांक्षी होत्या. आपल्या लिखाणातून अॅनी सातयाने आणि विविध मार्गांनी, लिंग, भाषा आणि वर्गावर आधारित असमानतेवर भाष्य करत राहिल्या. त्यांचा लेखनाचा मार्ग खडतर होता.

अॅनी एर्नॉक्स या प्रसिद्ध फ्रेंच लेखिका

ग्रामीण पार्श्वभूमी असल्याने त्याचा प्रभाव अॅनी एर्नॉक्स यांच्या लेखनावरही दिसून येतो. त्यांनी डायरीच्या स्वरूपात 'कच्चा' प्रकारचे गद्यही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. अॅनी यांनी त्यांच्या बालपणापासून जर्नल डू डेहोर्स (1993; एक्सटीरियर्स, 1996) या ला वी एक्सटीरियर 1993-1999 (2000; थिंग्स सीन, 2010) या पुस्तकांमधून ॲनी यांनी त्यांच्या बालपणीशी संबधीत लेख प्रकाशित केले आहेत. अॅनी यांचे पहिले पुस्तक लेस आर्मोइरेस विदेस (1974; क्लीन आउट, 1990) हे होते. त्यांच्या ला प्लेस (1983; अ मॅन्स प्लेस, 1992) या पुस्तकात त्यांनी केवळ शंभर पानांमध्ये त्यांच्या वडिलांचे आणि संपूर्ण सामाजिक वातावरणाचे चित्र रेखाटले आहे.

सामाजिक असमानतेकडे पाहण्याच्या दृष्टीत बदल करण्यासाठी लेखण हे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे लेखण ही एक राजकीय कृती आहे. कल्पनेचे बुरखे फाडण्यात त्याची मोठी भूमिका आहे.

: अॅनी एर्नॉक्स

दरम्यान, 3 ऑक्टोबरपासून नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी (सोमवारी) वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्वीडनच्या स्वांते पाबो यांना, तर मंगळवारी अॅलेन अॅस्पेक्ट, जॉन एफ क्लॉझर आणि अँटोन झेलिंगर यांना भौतिक शास्त्रासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. बुधवारी रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने कॅरोलिन आर. बर्टोझी , मॉर्टन मेल्डल आणि के. बॅरी शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर केले.

दरम्यान, मागील वर्षी टांझानियन कांदबरीकार अब्दूलरझाक गुरनाह यांना साहित्य क्षेत्रातील पुरस्कार देण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT