Latest

संगमनेर : बनावट सोने ठेऊन 68 लाख 94 हजारांची फसवणूक

अमृता चौगुले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत 32 खातेदारांनी बनावट सोने ठेवून बँकेची 68 लाख 94 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी या 32 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत.
याबाबत संगमनेर शहर पोलिसां कडून समजलेली अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा संगमनेर ही एक अग्रगण्य बँक आहे. या बँकेत दि. 18 जानेवारी 2023 रोजी सोन्याचे ऑडिट आणि सोन्याच्या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन केले.

पुनर्मूल्यांकनाच्या उद्देशाने बँकेतील संगमनेर शाखेच्या तीनही सुवर्ण मूल्यधारकांना बोलवले. या गोल्ड ऑडिटमध्ये 33 बनावट सोन्याचे पाकीट आढळले. राजमनी ज्वेलर्सचे जगदीश लक्ष्मण शहाणे यांची 5 फेब्रुवारी 2016 रोजी त्यांना बँकेने गोल्ड व्हॅल्युअर म्हणून नियुक्त केले. जगदीश शहाणे यांनी शेवटचे नूतनीकरण दि. 12 फेब्रुवारी 2020 रोजी केले आहे, जे 12 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैध आहे. बँकेने दि. 10 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या करारानुसार गोल्ड लोन मूल्यांकनामध्ये कोणत्याही गैरव्यवहारासाठी गोल्ड व्हॅल्युअर जगदीश शहाणे जबाबदार आहेत.

दरम्यान, या कालावधीत आरोपी जगदीश शहाणे यांनी 127 गोल्ड लोनचे मूल्यमापन केले आहे. या 127 गोल्ड लोनमधून गोल्ड ऑडिटमध्ये 31 खातेदारांनी सोने बनावट ठेवल्याचे उघड झाले आहे. या 31 खातेदारांनी ठेवलेल्या बनावट सोन्याची किंमत 68 लाख 94 हजार आहे. तिची दि. 18 जानेवारी 2023 पर्यंत 72 लाख 82 हजार 652 रुपये थकबाकी झाली आहे. बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकार्‍यांनी थेट पोलिस ठाणे गाठले.

याबाबत बँकेचे शाखा प्रबंधक नंदकिशोर म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सविता दीपक जाधव (रा. मालदाड रोड संगमनेर), दीपक दत्तात्रय जाधव (रा. महात्मा फुलेनगर, संगमनेर), रवींद्र रमेश राजगुरू (रा. मालदाडरोड, गणेशविहार कॉलनी, संगमनेर), संदीप नंदू कुलांगे (रा.बडोदा बँक कॉलनी, पोकळेमळा, संगमनेर), आयुब उस्मान पठाण रा.लखमीपुरा संगमनेर), प्रकाश मारुती तुपसुंदर (रा. घुलेवाडी, माझेघर हाऊसिंग सोसायटी, संगमनेर), स्वप्नील भास्कर पगार (रा. चिंचवली गुरव, संगमनेर), संजय बद्रीदास बैरागी (रा. दत्ता देशमुख नगर, ऐश्वर्या पेट्रोलपंप, संगमनेर), विजय भास्कर अवचिते (रा. पावबाकीरोड मारुती मंदिराजवळ, संगमनेर) प्रतिक नानासाहेब केरे (रा. संगमनेर रोड, संगमनेर), कैलास रामनाथ शिरसाठ (रा. साखर कारखाना रोड, पानसरे मळा, घुलेवाडी), ताराबाई रावजी घुगे (रा. नाशिक- पुणे रोड, संगमनेर), नानासाहेब भागवत राऊत (रा. घुले वाडी, ता. संगमनेर), मारुती अण्णासाहेब मंडलिक (रा.रायतेवाडी फाटा, माळीनगर, संगमनेर), वैभव प्रकाश वाकचौरे (रा. माझेघर सोसायटी, घुलेवाडी संगमनेर), राहुल शिवाजी गायकवाड (रा. वेताळेश्वर, घोडेकर मळा, कसारवाडी रोड, संगमनेर), प्रसाद संजय वर्पे (रा. वरवंडी, ता. संगमनेर), लखन शांताराम कडलग (रा. वडगावपान, ता. संगमनेर), विशाल अनिल उगले (रा. डोंगरगाव, ता. संगमनेर), मच्छिंद्र एकनाथ मंडलिक (रा. जाणतानगर रोड, संगमनेर), सागर गोरक्ष अवचिते (रा. शिबलापूर, ता. संगमनेर), कोमल राजेंद्र जगधने (रा. वाकडी, ता. राहता), कृष्णा भाऊसाहेब गाढवे (रा. घुलेवाडी, संगमनेर), सुधीर रावसाहेब घुगे (रा. अमृतनगर घुलेवाडी, संगमनेर), प्रदीप विठ्ठल गाडेकर (रा. मालुंजे,संगमनेर), जगदीश सुभाष म्हसे (रा. स्वामी समर्थनगर, संगमनेर), अमृतराज किसन वाघमारे (रा. खराडी, संगमनेर), संदीप पंढरीनाथ घुगे (रा. मालुंजे, संगमनेर), दत्तू खंडू साळवे (रा.पिंपारने, संगमनेर), गणेश भाऊसाहेब अवचिते (रा. मालुंजे, संगमनेर), पुष्पा राजेश पवार (रा.घुले वाडी, संगमनेर), प्रा. जगदीश सहाणे (रा. संगमनेर) अशा 32 जणांवर फसवणुकीच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT