France FIFA WC 2022 
Latest

France FIFA WC 2022 : गतविजेत्या फ्रान्सला मोठा धक्का, बेन्झेमा विश्वचषकातून बाहेर

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : फिफा विश्वचषकापूर्वीच गतविजेत्या फ्रान्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फॉरवर्ड करीम बेन्झेमा दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. बेन्झेमा मांडीच्या दुखापतीने त्रस्त असल्याचे फ्रेंच फुटबॉल फेडरेशनने आज (दि.२०) रविवारी सांगितले. प्रशिक्षणादरम्यान त्याला ही दुखापत झाली. (France FIFA WC 2022) बेन्झेमाने गेल्या वर्षांत आपल्या करिअरमधील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. गेल्या मोसमात त्याने आपल्या क्लब रियल माद्रिदसाठी ४४ सामन्यांत ४६ गोल केले होते. त्याने केलेल्या या खेळीमुळे संघाने ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले होते. (France FIFA WC 2022)

प्रशिक्षण डिडिएर डेसचैम्प्स म्हणाले, मी बेन्झेमासाठी खूप दुःखी आहे. त्याने या विश्वचषकाला आपले ध्येय बनवले होते. मात्र, या दुखापतीनंतरही माझा माझ्या संघावर पूर्ण विश्वास आहे. आमच्यासमोरील आव्हान पेलण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. बॅलन डी'ओर विजेता बेन्झेमा गेल्या काही काळापासून हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीशी झुंज देत होता. शनिवारी त्रास वाढल्यावर त्याला ट्रेनिंग सेशनपासून दूर राहावे लागले. बेन्झेमासह संघाला याआधी, मिडफिल्डर एन'गोलो कांटे आणि पॉल पोग्बा, न्कुकू आणि बचावपटू किम्पेम्बे यांच्या रूपात धक्के लागले आहेत.

बेन्झेमाने गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. गेल्या मोसमात त्याने आपल्या क्लब रियल माद्रिदसाठी 44 सामन्यांत 46 गोल केले होते. यामुळेच संघाने ला लीगा आणि चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले. बेन्झेमा शेवटचा २०१४ साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळला होता. त्यावेळी तो फ्रान्सकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू होता. तथापि, २०१८ साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत बेन्झेमाला संघात स्थान देण्यात आले नव्हते.

२०१६ मध्ये त्याला फ्रान्सने संघातून वगळले होते. २०१८ साली झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेनंतर बेंझेमा राष्ट्रीय संघात परतला आणि त्याने आतापर्यंत फ्रान्ससाठी १६ सामन्यांमध्ये १० गोल केले आहेत. फ्रान्सचा गट-ड मध्ये समावेश आहे. फ्रान्सचा पहिला सामना मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे.

हेही वाचा;

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT