Latest

Zika virus : कोल्हापूर शहरात चार गर्भवतींना झिकाची बाधा; सर्वेक्षण गतीने; आरोग्‍य विभाग सतर्क

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरात चार गर्भवतींना झिकाची बाधा झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने गर्भवतींचे गतीने सर्वेक्षण करून झिका व्हायरस तपासणीसाठी नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. संकलित केलेले नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही ) तपासणीसाठी पाठविले जात आहेत, अशी माहिती महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांनी दिली.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने झिका व्हायरसचे विशेष सर्वेक्षण सुरू केले आहे. 15 हजार 668 नागरिकांचा, 4 हजार 325 घरांचा सर्व्हे करून आतापर्यंत 12 हजार 360 नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्यामध्ये त्यांनी गर्भवतींच्या झिका व्हायरस तपासणीवर लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी 457 गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यामध्ये चार गर्भवतींना झिकाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वेक्षण मोहीम गतिमान करण्यात आली आहे.

व्हायरसचा शिरकाव झालेल्या विचारेमाळ, कदमवाडी, टेंबलाईवाडी, राजारामपुरी येथे धूर, औषध फवारणीसह डास उत्पत्ती ठिकाणे नष्ट करण्याचे काम हाती घेतले आहे. वॉर्डामध्ये आरोग्य कर्मचारी या व्हायरसबाबत जनजागृती करत आहेत. गर्भवतींचे नमुने एकत्र करून दोन दिवसांत पुण्याला झिका व्हायरस तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे डॉ. पावरा यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT