टँकरच्या धडकेने कारला आग, ४ जणांचा मृत्यू 
Latest

दिल्ली-जयपूर महामार्गावर तेल टँकरची कार आणि पिकअप व्हॅनला धडक; चौघांचा मृत्‍यू

निलेश पोतदार

हरियाणा ; पुढारी ऑनलाईन दिल्ली-जयपूर महामार्गावर गुरुग्रामजवळ तेल टँकरने कार आणि पिकअप व्हॅनला धडक दिल्याने चौघांचा मृत्यू झाला. दिल्ली-जयपूर महामार्गावर सिद्रावलीजवळ एका टँकरने कार आणि पिकअप वाहनाला भीषण धडक दिली. या धडकेत कारला आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. या अपघातात कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवली जात आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. अपघाताबाबत, बिलासपूर पोलिस स्टेशनचे विनोद कुमार म्हणाले, "आम्हाला महामार्गावर एका वाहनाला आग लागल्याची माहिती मिळाली होती. त्‍यावरून आम्‍ही घटनास्‍थळी पोहोचलो तेंव्हा कार आगीच्या भक्षस्‍थानी पडली होती. यामध्ये ४ लोकांचा दुर्देवी मृत्‍यू झाला. ट्रकच्या धडकेनंतर कारला आग लागली. पिकअप वाहनालाही धडक दिली. यामध्येही एक व्यक्‍ती अडकला होता. त्‍याला बाहेर काढण्यात आले. मात्र त्‍याचा मृत्‍यू झाला. या घटनेतील ट्रक ड्रायव्हर घटनास्‍थळावरून फरार झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT