Latest

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना हृदयविकाराचा झटका

रणजित गायकवाड

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना सोमवारी (दि. 24) हृदयविकाराचा सौम्य झटका आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी असताना जाधव यांना छातीत दुखू लागले. यावेळी समयसूचकता दाखवत गडकरींच्या निवासस्थानी उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकांनी जाधव यांना तात्काळ नजीकच्या आरएमएल रुग्णालयात हलवले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

जाधव हे कामानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी गेले होते. तिथेच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जाधव यांनी मार्च महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT