मुंबई; पुढारी ऑनलाईन : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या माहागाईत नागरिक भरडत चालले आहेत. कंबरडे मोडून टाकणाऱ्या या महागाईच्या दिवसात सर्वसामन्यांच्यासाठी मोठी खुश खबर देणारी बातमी समोर आली आहे. भारतीय स्टेट बँकेने मुदत ठेव योजनेच्या व्याजदरात (Fix Deposit Interest Rate) मोठी वाढ केली आहे. एसबीआयने २ कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवर २५ बेसिस पॉईंटपर्यंतची वाढ केली आहे. या शिवाय ४४० दिवसांची विशेष योजना एसबीआयने आणली असून यावर ग्राहकांना ७.१० टक्क्यांपर्यंत व्याजदर मिळणार आहे. ही योजना ३१ मार्च पर्यंतच मर्यादित असणार आहे. बँकेने लागू केलेले नवे व्याजदर १५ फेब्रुवारी पासून आमलात येणार आहे. (SBI Hikes Interest Rates)
एसबीआयचे वाढवलेले नवे FD रेट्स
SBI आपल्या सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर 3 टक्के, 46 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 4.5 टक्के, 180 दिवस ते 210 दिवसांच्या FD वर 5.25 टक्के आणि 211दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 5.75 टक्के ऑफर देते. टक्के व्याज देणे सुरू राहील. त्याच वेळी, व्याजदरात वाढ झाल्यानंतर, बँक 1 वर्षापासून 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.8 टक्के, 2 वर्षापासून 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7 टक्के, 3 वर्षापासून FD वर 6.5 टक्के देईल. 5 वर्षांपेक्षा कमी आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या FD वर 6.50 टक्के व्याज दिले जाईल. (SBI Hikes Interest Rates)
अधिक वाचा :