Latest

Zomato शेअर्सची कमाल! १०० रुपये पार, जाणून घ्या कारण

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोचा (Shares of food delivery platform Zomato) चा शेअर आज ८ टक्क्यांनी वाढून १०० रुपये पार झाला. या शेअरने आज १०२.८ रुपयांवर व्यवहार करत ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकही गाठला. दुपारी १२.४५ वाजता हा शेअर ५ टक्क्यांच्या वाढीसह १०० रुपयांवर होता.

पहिल्या तिमाहीत (Q1 FY24) झोमॅटोने फायदा नोंदवला. यामुळे झोमॅटोच्या शेअर्समध्ये वाढ झाली. Zomato ने जून २०२३ ला संपलेल्या तिमाहीत २ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत या फर्मला १८६ कोटींचा तोटा झाला होता. तर मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला १८९ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

जुलै २०२१ला झोमॅटोचा शेअर बाजारावर (Zomato Share Price) नोंदली गेली. इश्यु प्राईस ७६ रुपये असताना कंपनीचा शेअर ११५ रुपयांवर नोंद झाला. पण त्यानंतर लिस्टिंग प्राईसपेक्षा हा शेअर नेहमी खालच्या किंमतीवरच राहिला.

दरम्यान, फिनटेक फर्म One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स सुमारे ११ टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी अँटफिन (नेदरलँड) होल्डिंग बी. व्ही.कडून पेटीएममधील १०.३० टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा करार केल्यानंतर One97 कम्युनिकेशन्सचे शेअर्स वधारले. (Stock Market Updates)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT