मुंबई; पुढारी ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन एक दिवसांनी पुढे ढकलण्यात आले आहे. आता विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन दि. ३ आणि ४ जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दि. २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. दरम्यान, नव्या सरकारची बहुमत चाचणी सोमवारी होणार आहे. तर अध्यक्ष निवड रविवारी होणार आहे.
काल गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीदी शपथ घेतली होती. राज्यातील जनतेला न्याय देतानाच लोकांच्या मनातील सरकार साकार करणे तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.