पंचतारांकित हॉटेल 
Latest

MV Ganga Vilas : जगातील सर्वात लांब नदीवर फिरते पंचतारांकित हॉटेल! पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाइन डेस्‍क : पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जानेवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगातील सर्वात लांब नदी क्रूझ", MV गंगा विलासला (MV Ganga Vilas) झेंडा दाखवणार आहेत.

एमव्ही गंगा विलास (MV Ganga Vilas) वाराणसीपासून आपला प्रवास सुरू करेल आणि 51 दिवसांत सुमारे 3,200 किमी प्रवास करून बांगलादेशमार्गे आसाममधील दिब्रुगडपर्यंत पोहोचेल, दोन्ही देशांतील 27 नदी प्रणाली ओलांडून जाईल, असे त्यात म्हटले आहे.

13 जानेवारीला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवणार

देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नदीच्या प्रवासासाठी गंगा विलास क्रूझ वाराणसीला पोहोचली आहे.

13 जानेवारी रोजी, पंतप्रधान मोदी आसाममधील वाराणसी ते दिब्रुगढ या सुमारे 3200 किलोमीटरच्या देशातील सर्वात मोठ्या नदीच्या प्रवासाला झेंडा दाखवतील.

५१ दिवसांसाठी ही क्रूझ स्विस नागरिकांना ३२०० किलोमीटरच्या प्रवासात काशी ते आसाममधील दिब्रुगडपर्यंत घेऊन जाईल.

या 18 खोल्यांच्या क्रूझमध्ये सर्व आलिशान सुविधा आहेत ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत.

एअर इंडियाच्या विमानाने वाराणसीत दाखल झालेल्या 33 स्विस पर्यटकांच्या गटाचे विमानतळावर धोबिया नृत्य आणि मधुर शहनाईच्या सुरांनी स्वागत करण्यात आले.

बाबपूर येथून पर्यटकांना आलिशान वाहनातून रामनगर बंदरात नेण्यात आले. तेथून पर्यटकांनी क्रूझ राईडला सुरुवात केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT