मथुरा येथील यमुना एक्स्प्रेस वेवर सोमवारी सकाळी बस आणि कारमध्‍ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्‍ही वाहनांनी पेट घेतला. 
Latest

यमुना ‘एक्सप्रेसवे’वर भीषण अपघात, ५ जणांचा होरपळून अंत

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मथुरा येथील यमुना 'एक्स्प्रेसवे'वर  आज ( दि. १२) सकाळी बस आणि कारमध्‍ये भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्‍ही वाहनांनी पेट घेतला. कारमधील पाच जणांचा होरपळून अंत झाला. ( Five people burnt alive after car rams onto bus on Yamuna Expressway )

महावन पोलीस स्टेशन हद्दीत आग्राहून नोएडाला जाणारी खासगी स्लीपर बसचे मथुरेतील टायर पंक्चर झाले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस दुभाजकाला धडकली. या बसची स्विफ्ट डिझायर कार बसला धडकली. धडकेने बसच्या डिझेल टाकीला आग लागली. या आगीत कारही जळून भस्‍मसात झाली. आग इतकी भीषण होती की, कारमधील पाचही जणांचा होरपळून मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

अपघातग्रस्‍त बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्‍यात आले आहे. मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू असल्‍याचे पाेलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT