मुंबई, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळीबार केल्याची घटना आज घडली. पैशाच्या वादातून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. हा हल्ला मॉरिस भाई या व्यक्तीने केला असून या हल्लानंतर त्याने जीवन संपवण्यात आल्याचे देखील सांगितले जात आहे. गोळीबारानंतर घोसाळकर यांना दहिसर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिजीत घोसाळकर यांच्यावर मुंबईतील दहिसर येथे गोळीबार झाल्याची घटना आज (दि. ८) घडली. फेसबुक लाईव्ह सुरु असताना हा गोळीबार झाला. घोसाळकर यांनी मॉरिस नोरान्हा यांच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटी दरम्यानचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये अभिजीत घोसाळकर यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याचे दिसून आले. अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या मारण्यात आल्याचं कळल्यानंतर शिवसैनिकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली असून रुग्णालयात बाहेर मोठी गर्दी झाली आहे. हा गोळीबार झाल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मॉरिस भाई या नावाने प्रसिद्ध असलेला हा व्यक्ती स्वत:ची समाजसेवक म्हणून ओळख सांगत होता. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला होता. मॉरिस भाई हा आमदार सुनील राणे यांच्या जवळचा असल्याचे सांगितले जात आहे.
अभिषेक घोसाळकर हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव आहेत. अभिषेक घोसाळकर हे दोनदा मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. दहिसरमधील तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अभ्यासू आणि तळमळीने काम करणारा नगरसेवक म्हणून त्यांची प्रतिमा आहे. घोसाळकर हे दहिसर कांदरपाडा वॉर्ड नंबर 7 चे नगरसेवक होते. सध्या हा वॉर्ड शितल म्हात्रे यांच्याकडे आहे. सध्या घोसाळकर यांची पत्नी वॉर्ड नंबर 1 ची नगरसेविका होती.
हेही वाचा