मेरठ; पुढारी ऑनलाईन : एमआयएम अध्यक्ष असासुद्दीन ओवैसी यांच्या गाडीवर प्राणघातक झाला आहे. त्यांनी गाडीवर हल्ला झाल्याचे ट्विट करून माहिती दिली आहे. (Asaduddin Owaisi)
एमआयएम अध्यक्ष असादुद्दीन ओवैसी यांनी ट्विट करून म्हटले आहे की, माझ्या गाडीवर छिजारसी टोल गेटवर गोळीबार झाला. 4 राऊंड गोळीबार. तेथे ३-४ जण होते, सर्वजण शस्त्रे तेथेच सोडून पळून गेले. माझी गाडी पंक्चर झाली, पण मी दुसऱ्या गाडीत बसून निघालो. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. अलहमदुलिल्लाह. (Asaduddin Owaisi)
पी विधानसभा निवडणुकीमध्ये असादुद्दीन ओवेसी यांचा पक्ष AIMIM पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे. ओवेसी यांनी यूपीच्या अनेक विधानसभा जागांवर उमेदवार उभे केले आहेत. ओवेसी उमेदवारांच्या समर्थनार्थ उत्तर प्रदेशात सतत प्रचार करत आहेत. निवडणूक प्रचारानिमित्त गुरुवारी नोएडाला जात होते.
ओवैसी छिजारसी टोल गेटवर पोहोचताच त्यांच्या गाडीवर तीन ते चार जणांनी चार राऊंड फायर केले. गोळीबार केल्यानंतर सर्व पळून गेले आणि शस्त्रे त्या ठिकाणीच टाकली. भाजप नेते मोहसीन रझा म्हणाले की, ही घटना दुर्दैवी आहे, मात्र राज्यातील वातावरण बिघडवण्याचे हे काम केले जात आहे. बघून घेऊ अशी भाषा कोण करत आहे ? हा हल्ला कोणी केला हे तपासानंतर स्पष्ट होईल.
त्याचवेळी हापूर पोलिसांनी बदलपूर, नोएडा येथील सचिनला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. सचिनचा साथीदार शुभम हा फरार आहे, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या चौकशीत सचिनला ओवैसींच्या वक्तव्याचा राग आल्याचे निष्पन्न झाले आहे.
निवडणूक आयोगाने ८ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. ४०३ जागांच्या विधानसभेसाठी १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल १० मार्चला लागणार आहे. यूपीमध्ये १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी,३ मार्च आणि ७ मार्चला सात टप्प्यांत मतदान होणार आहे.