पुढारी ऑनलाइन डेस्क : झारखंडच्या धनबाद येथील एका रुग्णालय परिसरात आग लागून एका डॉक्टरसह 5 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेतील सर्व मयत हे डॉक्टराच्या कुटुंबातील होते. डॉक्टरसह त्याची पत्नी, भाच्चा आणखी एक नातेवाईक यांच्यासह डॉक्टरच्या घरात काम करणारी मोलकरीण यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, नेमकी कशामुळे आग लागली, रुग्णालयाचे नाव, मयताचे नाव आदि तपशील अद्याप मिळालेला नाही.