Latest

Stock Market | २०२३ -२४ वर्षात गुंतवणूकदारांना ‘या’ शेअर्सनी मिळवून दिला भरघोस परतावा

Arun Patil

गुरुवार दिनांक 28 मार्च रोजीची Monthly Expiry म्हणजे जणू रंगपंचमीचा बहारदार उत्सव होता. Nifty Media वगळता झाडून सारे प्रमुख आणि क्षेत्रीय निर्देशांक तेजीच्या हिरव्या रंगात न्हाऊन निघाले. ही तेजी विशेष एवढ्यासाठी कारण गुरुवारचा दिवस हा 2023 -24 या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस होता आणि त्यामुळे ही Monthly Expiry ही आर्थिक वर्षाचीही अखेरची Expiry होती. (Stock Market)

रशिया-युक्रेन आणि इस्रालय-हमास संघर्षांमुळे भू-राजकीय वातावरण तणावाचे असूनही Strong Macro – Economic Indicators मुळे शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना सरत्या आर्थिक वर्षात चांगला परतावा दिला. प्रमुख निर्देशांकांचा 2023-24 या आर्थिक वर्षातील परतावा पाहा.

निफ्टी 50 – 29%
सेन्सेक्स – 24.85%
बँक निफ्टी – 16.05%
निफ्टी मिडकॅप – 63.94%
निफ्टी स्मॉलकॅप – 75.49%

मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये ही जी अभूतपूर्व तेजी दिसून आली, ती म्युच्युअल फंडसमध्येसुद्धा प्रतिबिंबित झाली. निष्पॉन इंडिया ग्रोथ फंड एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटीज फंड, मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड, महिंद्र मनुलाईफ मिडकॅप फंड, आयटीआय मिडकॅप, फंड या फंडांनी साठ टक्क्यांहून अधिक परतावा दिला, तर बंधन आणि क्वॉन्ट या कंपन्यांच्या स्मॉल कॅप फंडांनी सत्तर टक्क्यांहून अधिक परतावा दिला.

गत आर्थिक वर्षात सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांनी चांगली कामगिरी केली. केवळ Nifty Media ने एक अंकी परतावा दिला. विविध क्षेत्रीय निर्देशांकांची (Sectoral Indices) मागील वर्षातील कामगिरी खालीलप्रमाणे

Nifty IT – 25.97%
Nifty Energy – 74.29%
Nifty Pharma – 58.08%
Nifty Infra – 67.34%
Nifty Realty – 132.52%
Nifty FMCG – 19.77%
Nifty Auto -74.94 %
Nifty Metal – 90.20 %
Nifty Media – 8.90%

वरील टेबल पाहिले, तर कित्येक वर्षांनंतर आलेली Realty Sectoral मधील तेजी हे आपल्या नजरेत लगेच भरते. Realty च्या जोडीला Auto Energy, Infra, Metal आणि फार्मा या सेक्टर्सनीही खूप चांगली कामगिरी केली. DLF, Prestige, Godrej Properties, Sobha या कंपन्यांनी दुप्पट-तिप्पट परतावा मागील एका वर्षात दिला आहे. परंतु, त्याचबरोबर त्यांचे Valuation ही प्रचंड महाग झाले आहे.

ऑटो सेक्टरमधील टाटा मोटर्स, बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर्स, एनर्जी सेक्टरमधील टाटा पॉवर, इंडियन ऑईल, कोल इंडिया, इन्फ्रा सेक्टरमधील अदानी पार्टस हिंद पेट्रो या शेअर्सनी गुंतवणूकदारांना भरघोस परतावा दिला. लुपिन, अरबिंदा फार्मा, ग्लेनमार्क, झायडस् लाईक या फार्मा कंपन्यांनीही दुप्पटीपेक्षा अधिक परतावा दिला. नाल्फो, हिंद कॉपर, अदानी एंटरप्राईज आणि वेलस्पन कॉर्प या मेटल कंपन्याही आघाडीवर राहिल्या.

सर्वाधिक परतावा दिलेल्या वरील प्रमुख पाच कंपन्यांचे वर्षापूर्वीचे आणि आजचे भाव पाहा. संयमाचे फळ शेअर बाजारात किती गोड असते, ते तुम्हाला दिसून येईल. (Stock Market)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT