पुणे : पुढारी वृत्तसेवा : वारजे परिसरातील न्यू अहिरे गावात सकाळी दर्शन झालेल्या बिबट्याला दोन ते अडीच तासाच्या प्रयत्नाने वन विभाग आणि रेस्क्यू टीम यांना बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. न्यू अहिरे परिसरात सकाळी साडेसात दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली. यानंतर आठच्या सुमारास पोलीस, वन विभाग आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी हजर झाले.
त्या एरियातील एका लाकडाच्या वखारीत बिबट्या दिसला. पण पकडण्याचा प्रयत्नात तो तिथून निसटला. त्यानंतर एका अपूर्ण इमारतीजवळ असलेल्या शेडमध्ये तो शिरला. तिथे असलेल्या बांधकाम साहित्यामुळे तो अडकून बसला . त्यादरम्यान त्याला भुलीचे इंजेक्शन देण्यात आले. काही वेळात बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर वन विभाग आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने त्याला पकडण्यात आले.