वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सध्या आमरण उपोषण करत आहेत. त्यांनी समाजासाठी केलेल्या संघर्षावर 'संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण आज (दि. १७) पूर्ण झाले. जरांगे पाटील यांचे अंतरवालीत रॅली च्या आगमनाचा सीन चित्रित करून या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. SangharshaYoddha Manoj Jarange Patil film
या चित्रपटात मोहन जोशी, रोहन पाटील, संदीप पाठक, श्रुती हांडे, सोमनाथ अवघडे, संजय कुलकर्णी, माधव अभ्यंकर, श्रीनिवास पोकळे, सागर करांडे, माधवी जुवेकर, विनीत धोंडे, अरबाज शेख आदी दिग्गज कलावंतासह १५० कलावंत व तंत्रज्ञ यांची टीम गेल्या दीड महिन्यापासून चित्रीकरणासाठी अंतरवाली सराटी परिसरात होती. SangharshaYoddha Manoj Jarange Patil film
लाठीचार्ज आणि मनोज जरांगे यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याने लोकांना मोठी उत्सुकता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आहे. दोन महिन्यात या चित्रपटाच्या शुटींगला सुरु करु, अशी घोषणा चित्रपट निर्माते गोवर्धन दोलतोडे यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात फक्त ३८ दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले. आता चित्रीकरणानंतर चे पोस्ट एडिटिंगचे काम एक महिन्यात पूर्ण होऊन हा चित्रपट २६ एप्रिलरोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती चित्रपट निर्माते गोवर्धन दोलतोडे यांनी 'पुढारी'शी बोलताना दिली.
या चित्रपटात मनोज जरांगे- पाटील यांची भूमिका रोहन पाटील यांनी केली आहे. तर जरांगे यांच्या वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ कलाकार मोहन जोशी आहेत. तर जरांगे पाटलांच्या सहकारी यांच्या भूमिकेत संदीप पाठक असणार आहेत. एका सीनमध्ये स्वतः मनोज जरांगे यांनी भूमिका करावी, अशी विनंती निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी केली होती. मात्र, ती जरांगे यांनी नाकारली.
या चित्रपटाच्या शुटींगची सुरुवात ही अंतरवाली सराटी गावातून झाली होती. आणि आज समारोपाचा सीन हा जरांगे यांचा अंतरवालीत रॅलीच्या आगमनाने होत आहे. तसेच मराठा समाजासाठी जरांगे यांनी केलेला वास्तविक संघर्ष या चित्रपटातून दाखवला जाणार आहे.
– गोवर्धन दोलताडे, चित्रपट निर्माते३८ दिवसांत चित्रीकरण पूर्ण
मोहन जोशी, संदीप पाठक, श्रुती हांडे, सोमनाथ अवघडे, संजय कुलकर्णी, माधव अभ्यंकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
हेही वाचा