pushpa movie  
Latest

Pushpa :ज्या खांद्यानं सर्वांना वेड लावलं त्या ‘पुष्पा’चा खांदा दुखावलाय

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयकॉन स्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा द राईज पार्ट १ ने धुमाकूळ घातलाय. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राईज: पार्ट १' ने जगभरात विक्रम मोडीत काढला आहे. तिसर्‍या आठवड्यात, चित्रपटाच्या स्क्रीनच्या संख्येत वाढ झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांवर गारूड करण्यास यशस्वी ठरला आहे. त्यामागचं कारण आहे स्टार्सची आणि चित्रपटाची क्रेझ.

या चित्रपटाचा स्टार अल्लूने या चित्रपटासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत. त्याच्या अखंड नृत्य चाली आणि अभिनय कौशल्याव्यतिरिक्त, पुष्पराज सिग्नेचर वॉक आणि देहबोली खूपच हिट झाली. पुष्पराजचा खांदा झुकवण्याची आणि दाढीखाली हात फिरवण्याची त्याची स्टाईल ही आयकॉनिक स्टाईल बनलीय. पण, तुम्हाला माहितीये का, खांदा झुकवून झुकवून अल्लूचा खांदा दुखावलाय. खांदा वाकडा करण्याची प्रॅक्टीस आणि बराच काळ तो त्याच स्थितीत ठेवल्याने खांदा अजूनही दुखतोय.

खांदा झुकवून चालणे हा अगदी एक ट्रेंड बनला आहे. परंतु, तुम्हाला माहित आहे का, अर्जुनने ही स्टाईल परफेक्ट करण्यासाठी २ वर्ष प्रॅक्टिस केलीय. त्यामुळे खांदा झुकल्यामुळे त्याला दुखापत झालीय.

अल्लूने एका वेबसाईटशी बोलताना माहिती दिली की, तीन तासांच्या चित्रपटासाठी त्याने तब्बल दोन वर्षे घालवली आहेत. ज्यामध्ये केवळ खांदा झुकवण्याचा प्रयत्न करायचा होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मला सांगितले की, त्याला एक अनोखी देहबोली असलेले पात्र हवे, जे लोकांच्या लक्षात राहिल. मग, अल्लूने ही देहबोली निवडली. झुकलेल्या खांद्याची कल्पना अल्लूला आवडली. माझ्याकडे तीन-चार कल्पना होत्या, पण खांदे उचलण्याची ही कल्पना योग्य वाटली. एक खांदा वर ठेवणे थोडे वेगळे वाटले आणि त्यात थोडे कष्ट होते. हे तीन तास नाही, (पण) दोन वर्षांच्या मेहनतीचे आहे. माझा खांदा अजूनही दुखतोय.

pushpa film actor fahadh faasil and allu arjun

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी चित्रपटातील एक न्यूड सीन का काढला. 'पुष्पा: द राईज'च्या क्लायमॅक्समध्ये अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल यांच्यावर हे सीन होते. रुढीवादी तेलुगू प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांमुळे दिग्दर्शकाने निर्णय बदलला.

प्रसारमाध्यमांशी झालेल्या बातचीतमध्ये दिग्दर्शक सुकुमार यांनी म्हटलं की- "क्लायमॅक्सच्यावेळची सीन आधी मूळ शूट केलेल्या दृश्यापेक्षा वेगळा असेल. अल्लू अर्जुन आणि फहाद याना क्लायमॅक्स सीनसाठी न्यूड जायचं होतं. पण, आम्ही तसं केलं नाही. कारण तेलुगू प्रेक्षकांसाठी असा सीन असणं म्हणजे मोठी गोष्ट आहे.

pushpa film actor fahadh faasil

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT