Latest

वर्ष संपण्यापूर्वी कर संबंधितातील कामे कशी पूर्ण कराल? जाणून घ्‍या सविस्‍तर

अमृता चौगुले

२०२२ वर्षातील शेवटचा महिना सुरू झाला आहे. नवीन वर्षाचे स्वागत जल्लोषात करा. मात्र तत्पूर्वी कराशी संबंधित २०२२ मध्ये राहिलेले काम अगोदर पूर्ण करा.

विलंब शुल्कासह प्राप्तिकर विवरण  भरणे, आयटीआरमधील चुका दुरुस्त करणे, जीएसटी रिटर्न ९ सीची फायलिंग आणि अॅडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता या गोष्टींचा विचार करायला हवा. यापैकी कोणतेही काम अर्धवट सोडले तर दंड भरावा लागेल. त्याचवेळी अतिरिक्त व्याजदेखील भरावे लागेल. अन्यथा कायदेशीर नोटीसही येऊ शकते. अशा अडचणी नव्या वर्षाच्या आनंदावर विरजण घालू शकतात. थोडी सजगता बाळगली तर त्यापासून आपला बचाव होऊ शकतो.

विलंब शुल्कासह प्राप्तिकर विवरण 

आपण २०२१-२२ चे प्राप्तिकर विवरणपत्र अद्याप भरलेले नसेल तर विलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत रिटर्न भरू शकता. एकूण उत्पन्न ५ लाखांपेक्षा कमी असेल तर आपल्याला एक हजार रुपये विलंब शुल्क द्यावा लागेल. तसेच एकूण उत्पन्न पाच लाखांपेक्षा अधिक असेल तर पाच हजार रुपयांचे विलंब शुल्क भरावे लागेल.

२०२२-२३ च्या ॲडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर आहे. दहा हजार रुपयांपेक्षा अधिक वार्षिक प्राप्तिकर भरणाऱ्यांना ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागतो. १५ डिसेंबरपर्यंत ७५ टक्के ॲडव्हान्स टॅक्स भरला नाही किंवा कमी टॅक्स जमा करत असाल तर १ जीएसटी नोंदणीकृत करदात्यांना प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यानंतर वार्षिक आयटीआर जीएसटीआर- ९ दाखल करावे लागते. गरज भासल्यास त्यात दुरुस्तीसह जीएसटीआर- ९ सी देखील जमा करता येते.

२०२१-२२ साठी त्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर ॲडव्हान्स टॅक्सचा तिसरा हप्ता आहे. त्यानंतर रिटर्न दाखल केल्यास दररोज २०० रुपये याप्रमाणे विलंब शुल्क भरावा लागतो. हे शुल्क टर्नओव्हरच्या कमाल ०.५ टक्क्यांपर्यंत आकारले जाऊ शकते. जीएसटीआर- ९ सी विवरणपत्र हे एका वर्षात पाच कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या व्यापारी, उद्योजकांसाठी आहे. टक्के व्याज आकारणी होईल.

आयटीआरमधील चुकांची दुरुस्ती 

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केलेले असेल आणि त्यात काही त्रुटी राहिल्या असतील, तर ३१ डिसेंबरपर्यंत सुधारित आयटीआर दाखल करू शकता. त्यानंतर चुक दुरुस्ती करता येणार नाही. या कारणामुळे कदाचित आपल्याला प्राप्तिकर खात्याची नोटीस येऊ शकते.

राधिका बिवलकर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT