पुढारी ऑनलाईन डेस्क : मल्लेश्वरममध्ये मैसूर रेशीम साडीच्या वार्षिक विक्री प्रदर्शनात एका साडीसाठी दोन महिला एकमेकांवर धावून गेल्या. साड्यांच्या प्रदर्शनातील एक तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून दोघी भांडताना दिसताहेत. प्रदर्शनात दोघींनाही एकच साडी आवडली. पण, एकाच साडीसाडी दोघीही एकमेकांना हाणामारी करताना दिसताहेत. इतकचं नाही तर दोघींनी एकमेकींचे केस धरुन मारामारी केल्याचे व्हिडिओत दिसते. त्या दोघींची भांडणे सोडवायला सिक्युरिटी धावून आळा तरीही दोघीही भांडत राहिल्याचे दिसते. यावेळी प्रदर्शन स्थळी महिलांची गर्दीही पाहायला मिळते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.