पुढारी ऑनलाईन डेस्क : 'इंडियन आयडयल' फेम आणि यूट्यूबर फरमानी नाज (Farmani Naaz) सध्या खूप चर्चेत आहे. तिने गायलेल 'हर हर शंभू' (Har Har Shambhu) या गाण्याने तिला एक ओळख दिली. आता ती पुन्हा एकदा 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) या गाण्याने पुन्हा चर्चेत आली आहे. तिचं हे गाण युट्युबला तब्बल १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या या गाण्याची सर्व स्तरातून चर्चा होत आहे.
स्वातंत्र्य दिनाला काहीच दिवस राहिले आहेत. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे आनंदीमय वातावरण पाहायला मिळत आहे. नाजने स्वातंत्र्य दिनाच्या काहीच दिवस अगोदर शेअर केलेल्या 'हर घर तिरंगा' गाण्याची चर्चा होवू लागली आहे. हे गाणं फरमान नाजने गायलं आहे. गीतकार अनुज मुल्हेडा असून संगीत परविंदर सिंग यांनी दिले आहे. या गाण्यातून फरमान आणि तिच्या टीमने सामाजिक एकतेचा संदेश दिला आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये तिने पगडी, दुपट्टा अन् बँड परिधान केला आहे. तिने हे गाणं आपल्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर केलं आहे. 'हर हर शंभू' या गाण्याप्रमाणेच या गाण्यालाही लोकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. तिच्या या गाण्याचे कौतुक होतं आहे.
१० लाखांहून अधिक लोकांनी गाणं पाहिलं
इंडियन आयडल फेम फरमानी नाज सध्या 'हर घर तिरंगा' गाण्याने खूप चर्चेत आहे. तिने याअगोदरही ती एका गाण्यामुळे चर्चेत आली होती. कावड यात्रेच्या दरम्यान तिने भगवान शिव शंकराचं गाणं 'हर हर शंभू' गायलं होतं. त्यामुळे मुस्लिम कट्टरपंथी नाराज झाले होते. २४ जुलैला अपलोड केलेल्या या गाण्याला तब्बल दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे.
फरमानी नाज उत्तर प्रदेश मधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील गायिका आहे. तिची लोकप्रियता ही फक्त तिच्या जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर, देशभर आहे. इंडियन आइडल सीझनच्या १२ व्या भागात ती सहभागी झाली होती. तिथूनच ती चर्चेत आली. तिचे युट्युबला तब्बल ४० लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत.
फरमानीच लग्न २०१७ मध्ये मेरठमधील इमरान याच्याशी झाली. एका वर्षांनी त्यांना मुलगा झाला. मुलगा आजारी पडला तेव्हा फरमानीच्या सासरचे लोक फरमानीच्या आईकडे नातवाच्या उपचारासाठी पैशाची मागणी करु लागले. तेव्हा फरमानी आपल्या माहेरी राहायला गेली. फरमानी इंडियन आयडल शोमध्ये आपल्या भावासोबत सहभागी झाली होती. तिथे परिक्षकांकडून तिला खुप वाहवा मिळाली. पण अचानक मुलगा आजारी असल्याने तिला परत याव लागलं.
फरमानी म्हणते कोणत्याही कलाकाराला कोणताही धर्म नसतो. गाणं किंवा संगीतासाठी कोणताही धर्म नसतो. मास्टर सलीम, मोहम्मद रफी यासारख्या गायकांनी सुद्धा भजन म्हटलं आहे. फरमानी बिग बॉस १६ या सीझनमध्ये असू शकते अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. अभिनेता सलमान खान कडून तिला ही ऑफर मिळाली असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचलंत का?