फीचर्स

असा हा श्री गणेश

स्वालिया न. शिकलगार

नेमेची येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे तो नेमेचि येतो पण हवा तिथं हवा तेवढा येत नाही. पाऊस जसा मनमानी करतो तशी न करता गौरी शंकराचा पुत्र, स्कंदाचा भाऊ मंगलमूर्ती श्री गणेश मात्र न चुकता भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरघरात आगमन करतो. हे व्रत गणेशाचे महाव्रत म्हणून ओळखले जाते.

सण, व्रते आपल्याला आवडतात. भावपूर्ण अंत:करणाने व सारग्राही बुद्धीने जर सणवार साजरे केले, तर ते आत्मिक आनंद निर्माण करतात.

गणेशाची आराधना अर्थात गणपती पूजन हा मुळातच श्रध्देचा विषय आहे. श्रध्दा, भक्ती या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. गणेश ही देवता विद्या आणि सिद्धीची प्राप्ती करून देणारी आहे. तिची आराधना आजच्या युगातही तेवढीच महत्वाची ठरते.

श्री गणपती आराधना अथर्वशीर्षमध्ये अथर्वण ऋषीचे वचन आहे. दर महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या चतुर्थीच्या दिवशी (विनायक आणि संकष्टी) उपवास करून हे गणपती अथर्वशीर्षाचे जो सर्व दिवस पठण करतो तो माणूस विद्‍वान होतो. की ज्या विद्वत्तेमुळे त्या माणसाला मुक्ती मिळते. म्हणजे, ब्रह्मविद्येचे प्रकाश होऊन त्यात तो तल्लीन होतो.

चतुर्थीचा उपवास म्हणजे, उप- जवळ आणि वास म्हणजे राहणे. देवाच्या सानिध्यात सतत राहणे, संस्कृती संस्काराने बनते. पशूसृष्टी जवळ अंधपणे प्रकृतीच्या अधीन असणारी जीवसृष्टी मनुष्याला प्राप्त झाली की बुद्धी व निवड या दोन गुणाधिक्यामुळे मनुष्यापुढे पशुतुल्य जीवन जगून अधोगतीला तरी जावे लागते. किंवा सत्संगती, विवेक, ज्ञान, विचार, सुसंस्कार, इ. च्या साक्षीने चढून देवत्वास तरी प्राप्त व्हावे असे दोन मार्ग उघडे असतात.

पूजा विधी हा त्यातील कर्मयोगअंतर्गत सर्वोपयोगी मार्ग आहे. त्यादुष्टीने संकल्पाचे सामर्थ योग्य मार्गाने उपयोगात आणून देवत्वाप्रत जपण्यासाठी उत्तम सशास्त्र पूजा श्रध्दायुक्त अंतकरणाने करावी.

व्रत हे इच्छित फलप्रातीकरीता करावयाची साधना आहे. श्रीकृष्णाच्या युगापूर्वी ते केले जात असे. म्हणूनच श्रीकृष्णावर आलेला मिथ्या अपवाद नाहीसा करण्यासाठी नारदाने श्रीकृष्णाला चतुर्थीला व्रत करावयास सांगितले होते. हे व्रत करताच श्रीकृष्णावर आलेला मिथ्यावाद नाहीसा होऊन श्रीकृष्ण अपवादमुक्त झाले. श्रीकृष्णानेही ते चतुर्थी व्रत कुंतीपुत्र धर्मराजाला करण्यास सांगितले होते.

नैमिवारण्यात वास करणारे शौनकादिक ऋषिसमुदाय सुत नावाच्या पुराणिकांमध्ये जो श्रेष्ठ त्याला म्हणाले, हे सूतपुत्रा मनुष्याची कार्य निर्विध्नपणे कशी सिद्ध होतील. द्रव्य प्राप्ती, पुत्र, सौभाग्य, संपत्ती इत्यादिकांची प्राप्ती कशाने होईल? कलह, वितुष्टपणा कसा नाहीसा होईल? कामात कार्यसिद्ध कशाने होईल? आणि कोणत्या देवास नमस्कार केला असता मनुष्याची कार्यसिद्धी होईल?

सूत बोलतात, श्रषी हो, पुर्वी कौरव व पाडव यांची सैन्ये युद्धात तयार होऊन आपआपल्या ठिकाणी उभी राहिली असता कुतींचा पुत्र युधिष्ठर याने श्रीकृष्णला प्रश्न केला होता की, हे देवकी पुत्रा श्रीकृष्ण कोणत्या देवतेस नमस्कार केला असता आम्हास निर्विध्नपणे तुला जय मिळवून राज्यप्राप्ती होईल ते कृपा करून सांगा.

श्रीकृष्ण सांगतात. भगवान गजराज यांची तू पूजा कर. गजराजाची पूजा करशील तर निर्विध्नपणे तुला राज्य मिळेलयात शंका नाही. तेव्हा धर्मराज विचारतात, हे देवा कोणत्या विधीने गणपतीची पूजा करावी आणि तिथीसत्याची पूजा केली असता तो सर्व सिद्धी देणारा होईल.

श्रीकृष्ण सांगतात, राजा भाद्रपद महिन्यात शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा करावी किंवा माध, श्रावण, मार्गशीर्ष शुल चतुर्थीस करावी. राजा शक्ल चतुर्थीच्या गजाननाची पूजा करावीच. तसेच ज्या ज्या दिवशी ह्रती उत्पन्न होईल त्यादिवशीही करावी. प्राप्त: काली गणपतीची पूजा करावी. (निष्क) चार तोळे सिवर्ण किंवा ज्याची अशी प्रतिमा करण्याची शक्ती नसेल तर मातीची करावी, आणि…

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटीसमप्रभम्
निर्विध्नं कुरू में देव सर्वकार्यषू सर्वदा

(हे वक्रतुंड हे महाकाय गणेश कोटी सुर्य इतके तेज असमाऱ्या देवा मला सर्व कार्यात नेहमी विध्नहित देव) असे म्हणून ज्यास एक दंत, सुपासारखे कान, हत्तीसारखे मुख चार होत आहेत पाश आणि अंकुशही आयुथे ज्याच्या हातात आहेत अशा सिद्धिविनायकाचे ध्यान करावे. नंतर आवाहन, आसन, पाध्य व अर्हा अर्पण करून नंतर प्रयत्नाने यथाविधी पूजा करावी.

पृथक पंचामृत स्ऩान घालावे. सर्वप्रदाय नम: असे म्हणून भक्तीपुर्वक दोन तांबडी वस्त्रे द्यावी. गणाध्यक्षाय नम: असे म्हणून पुष्पे अर्पावी, उमासुताय नम: असे म्हणून धूप, रूद्रप्रियाय नम: म्हणून दीप विघ्ननाशिके नम: म्हणून नैवेद्य अर्पण करावा.

दक्षिणा व तांबूल समर्पण करावे. नंतर एकविस दुर्वा घेवून पुढे सांगितलेल्या नावानी दोन-दोन दुर्वा, गंध, पुष्प, अक्षता यासंहित त्या अर्पण कराव्यात ते मंत्र असे,गणाधिषाय नम:, उमापुत्राय नम:, अघनाशय नम:, एकदंताय नम:, द्रुभवक्राय नम: , मुषकवाहनाय नम:, विनायकाय नम:, ईशपुत्राय नम: , सर्वसिद्धीप्रदायकय नम: ,कुमारगुरवे नम: या नावानी यथाविधी पूजा करावी. बाकी राहीलेली एक दुर्वा वर सांगितलेल्या सर्व नावे इच्चारून गंध, अक्षता, पुष्प यासह ती अर्पण करावी.

नंतर तुपात तळलेले एकवीस मोदक घे‍ऊन गणाध्यक्षांच्या समीप ठेवावे. एक गणाधिपाला नैवेद्य म्हणून अर्पण करावा आणि गणपतीची प्रार्थना करावी. हे विनायका हे गणेशा तुला सर्व देव नमस्कार करतात. हे पार्वतीप्रिया हे विघ्नेशा तू माझे निघ्न दूर कर.

गणेश घेतो नगणेशच देऊ शकतो. याकरिता आम्हा उभयंताही गणेशचा तारणारा आहे. अशा त्या गणेशाला नमस्कार असो, असे म्हणून नमस्कार करावा. या प्रमाणे नैमित्तिक कर्म करून इष्टदेवतेची पूजा करावी. तैजवर्जित भोजन करावे. राजा धर्म याप्रमाणे गणनाथांचे पूजन केले असता निश्चयपूर्वक तुला विजय प्राप्त होईल.

पूर्वी त्रिपुरासुराला मारण्याचा इच्छेने शंकराने हा लिद्धीविनायक पूजिला होता. अहल्येने आपल्या पतीचा शोध लागावा म्हणून ही गणपती पूजन केले होते. तसेच पूर्वी भगीरथाने आगीरथी आणण्यासाठी गणेश पुजिला होता. पुढे सांबाच्या (जांबतीपुत्राच्या) अंगावर कृष्ठव्याधि उत्पन्न झाला म्हणून त्यांनी सिद्धीविनायकाची पूजा केली तेव्हा त्याची व्याधि गेली.

वास्तविक आदिगणेश गा मुळातच ओॆकाररूप असल्यामुळे त्याच्या स्वरूपाचे यथार्थ वर्णन अर्थवर्ण श्रषी स्वत: अनुभवविलेले स्वरूपज्ञान जगदव्दारार्थ कथन करतात.

तू सत्व, रज आणि तम या त्रिगुणांपलिकडील आहे. तू जागृती स्वप्न व सुषुफ्ति या तीन अवस्थापलिकडिल आहेस. तू स्थूल, सुक्ष्म व आनंदमय असा देहांपलिकडील आहेस. तू शरीरातील मूलाधार नावाच्या चक्राच्या ठिकाणी नित्त राहतोस. तू जगताची उत्पत्ती , स्थिती व लय करणाऱ्या विविध शक्ती तत्वस्वरूपी आहेस.

जीवनमुक्त योगी निरंतर तुझे ध्याम करित असतात. तू ह्रम्हादेव (सृष्टीकर्ता). तू विष्णू (सृष्टीपालक)तू शंकर (सृष्टी संहारक) तू इंद्र (क्षिभुनैश्रर्याचा उपयोग घेणारा), तू अग्नि (यज्ञामध्ये ङविर्द्र ग्रहण करणारा)तू वायू (सर्व जीवांना प्राण देणारा)तू सुर्य (सर्वाना प्रकाश देऊन कार्याची प्रेरणा करणारा) तू चंद्र (सर्व वनस्पतीना जावन देणारा) तू ब्रम्हा (सर्व प्राणीणात्रातील जीवरूपी) तू पृथ्वी अंतरिक्ष, स्वर्ग व ओकार गे सर्व आहेस.

ज्ञामनय असून विज्ञानमयही असणाऱ्या या गणेशाची उपासमा र्पत्येक संप्रदायात आहे. अगदी जैन पंथातही आहे. भारतीबाहेरील जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यत श्रीगणेशाची आराध्यना होत असली पाहिजे हे आधुनिक उत्खननाने सिद्ध झाले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.

आईका यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य
हे साही गुणवर्य वसती जेथ म्हणोनि ते भगवंत

असा हा भंगवान श्री गणेश सुखकर्ता, दु: खहर्ता, मंगलमुर्ती सर्वाचे कल्याण करणारा, लवकर प्रसन्न होणारा, ज्ञानोबा रायांच्या म्हणण्याप्रमाऩे स्वसंवेध, आत्मरूपच असणारा, अत्यत बुद्धिमान, सांबसदाशिवाने भेळेपणा दिलेले आत्मलिंग रावणाच्या हातून हिनकतीने परत मुळवणारा, शुल नावाच्या गरिब ब्राम्हाणाकडे तांदळाची पेज आवडीने खाणारा या गणरायाचे मंगल स्वरूप तर सर्वाना परिचयाचे आहेच.

त्या ओंकाररूपी निर्गुण आणि गणपती नामक सगुण गणेश स्वरूपात वंदन करून त्याने आपणा सर्वाना ज्ञान, विज्ञानाचा प्रसाद दोईन सर्वाचे आयुष्य खऱ्या अर्थाने मंगलमय करो अशी प्रार्थना आपण सर्वजण करू या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT