अतिताणात काम करताय? 'टॉक्सिक वर्क ' कसे ओळखाल? File Photo
फीचर्स

अतिताणात काम करताय? 'टॉक्सिक वर्क' कसे ओळखाल?

Toxic Work : अतिताणाचे बळी पडू नका, स्वत:कडे दुर्लक्ष करु नका...

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने सीए अ‍ॅना सेबॅस्टियन पेरायल या २६ वर्षीय तरुणीचा जीव गेला. ती अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या कार्यालयात काम करत होती. तिच्या कुटूंबियांनी आरोप केला आहे की, कंपनीतील जास्त कामाच्या ताणामुळे आपल्या मुलीला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर 'कामाच्या ठिकाणावरील ताण-तणाव' ही बाब चर्चेला आली आहे. पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेवूया कामाच्या ठिकाणचे वातावरण त्रासदायक (Toxic Work) आहे की नाही.

अतिताणात काम करताय? 'टॉक्सिक वर्क ' कसे ओळखाल?

नोकरी हा बऱ्याचजणांचा अविभाज्य भाग झाला आहे. कामाच्या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात चांगल्या-वाईट घटना घडत असतात. जर तुम्ही काम करत असाल आणि तिथल्या वातावरणाने त्रस्त आहात तर त्या वातावरणाकडे दुर्लक्ष करु नका. तुमच्या कामाच्या ठिकाणावरील बॉस किंवा तुमची कंपनी\ संस्था विषारी म्हणजे त्रास देणारी आहे का? हे ओळखण्यासाठी पुढील पाच बाबी पडताळून पहा. अंकुर वारिको (Ankur Warikoo) त्यांच्या पोस्ट मध्ये लिहतात, जर...

  • तुमच्या कंपनीचा किंवा तुमच्या बॉसचा तुमच्यावर विश्वास नसतो

  • ते भीती आणि राजकारण याबाबतचे वातावरण निर्माण करतात

  • ते कोणत्याही कृतीऐवजी तुमचे सूक्ष्म व्यवस्थापन (Micromanaging) करतात

  • कामाच्या ठिकाणी ते तुमच्याकडून कोणत्याही स्वरुपाची अपेक्षा स्पष्ट करत नाहीत

  • तुमच्या बाबतीत असणारी वाईट बातमी तुमच्यापर्यंत वेळेत पोहचवत नाहीत

अतिताणात काम करताय? 'टॉक्सिक वर्क ' कसे ओळखाल?

जर तुम्हाला योग्य वेळी तुम्हाला ओळखता आले तुमची कंपनी \ संस्था त्रासदायक आहे, तर तुम्ही स्वतःचे कल्याण आणि तुमच्या करिअरचे संरक्षण करण्यासाठी योग्य पावले उचलू शकता. त्यासाठी अगोदर ते ओळखता येणे गरजेचे आहे. जेव्हा लक्षात येईल तेव्हा हारू नका. ताण घेवू नका. स्वत:कडे दुर्लक्ष करु नका. नातेवाईकांच्या संपर्कात राहा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT