फीचर्स

WhatsApp : व्हॉटस्अॅपचा गैरवापर ; ७४ लाख खाती बंद

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे व्हॉटस्अॅपने ऑगस्ट महिन्यात भारतातील ७४ लाख २ हजार अकाऊंट बंद केली आहेत. व्हॉटस्अॅप प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्यामुळे कारवाई करण्यात येत असल्याची माहिती व्हॉटस्अॅपच्या सूत्रांनी दिली

35 लाख यूजर्सच्या संमतीशिवाय अथवा त्यांना कल्पना दिल्याशिवाय पूर्वलक्षी प्रभावाने भारतातील ३५ लाख अकाऊंट बंद करण्यात आली आहेत

+91 प्लस ९१ या फोन क्रमांकामुळे भारतीय अकाऊंट ओळखता येतात

कंपनीच्या उपाययोजना

सेफ्टी फिचर्स आणि कंट्रोलसाठी तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये अभियंते, डाटा शास्त्रज्ञ, विश्लेषक, संशोधक, कायदेतज्ज्ञ आदींची मदत घेऊन ऑनलाईन सुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे.

केंद्राकडून अॅपिलेट स्थापना

सोशल मीडियावरील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ग्रीव्हन्स अॅपिलेट कमिटीची स्थापना केली आहे. यानुसार यूजर्सना कंपन्यांविरोधात केंद्राकडे अपील करता येणार आहे.

SCROLL FOR NEXT